IND vs NZ : स्टेडियममध्ये एवढे प्रेक्षक कसे बोलावू शकता ?; रांची टी-२० सामन्याविरोधात याचिका दाखल

शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेसह सामना आयोजित करण्यास परवानगी देण्याच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे

भारत आणि न्यूझीलंडमध्ये १९ नोव्हेंबरला जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दुसरा टी-२० सामना होणार आहे. दोन्हीही संघातील खेळाडू १८ तारखेला रांची विमानतळावर दाखल होतील. अशातच शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामना एका वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान, शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेसह सामना आयोजित करण्यास परवानगी देण्याच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामन्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे खेळांडूसांठी शंभर रूम बुक करण्यात आल्या आहेत. भारतात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला नसल्याने या सामन्यात होणाऱ्या गर्दीवरून आता हा वाद कोर्टात पोहचला आहे.

दरम्यान, शंभर टक्के प्रेक्षक क्षमतेसह सामना आयोजित करण्यास परवानगी देण्याच्या विरोधात झारखंड उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामन्यात सर्वकाही बायो-बबल कार्यप्रणालीनुसार होणार असल्याचे याआधीच भारतीय क्रिकेट बोर्डातर्फे सांगण्यात आले होते. मात्र अॅड.धीरज कुमार यांनी जनहित याचिका दाखल करून याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटले की, “राज्य सरकारने जारी केलेली कोरोना कोरोना कार्यप्रणाली किती काळ लागू आहे. ५० टक्के क्षमतेने लग्नसमारंभ पार पडत आहे. शाळा देखील ५० टक्के क्षमतेने चालू आहेत. तर धार्मिक स्थळदेखील याच स्वरूपात चालू आहेत. मात्र अशातच झारखंड क्रिकेट असोसिएशनने भारत आणि न्यूझीलंडमधील सामन्यासाठी शंभर टक्के क्षमतेनुसार प्रेक्षकांना अनुमती कोणत्या आधारावर दिली आहे”. असे अॅड धीरज कुमार यांनी म्हटले.

लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सुरूवात देखील बायो-बबलच्या माध्यमातून झाली होती. तरीदेखील कित्येक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाने खेळाडू संक्रमित होत असल्यामुळे भारतातील आयपीएलच्या हंगामाला स्थगिती देण्यात आली होती आणि बायो-बबलवर देखील प्रश्न उपस्थित झाले होते.

झारखंड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अजय शाहदेव यांनी सांगितले की तयारी सगळी झाली आहे. या मैदानावर या आधी देखील आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. मात्र आता शंभर टक्के क्षमतेसह दर्शकांना परवानगी दिली आहे पण कोरोनाच्या नियमांचे पालन करून सामना खेळला जाईल असे शाहदेव यांनी सांगितले.


हे ही वाचा: Table tennis: मनिका बत्राच्या आरोपांची होणार चौकशी, न्यायालयीन समिती स्थापन; TTFI वर गंभीर आरोप