राहुल द्रविड भारताचे कोच आहेत हे धक्कादायक; रिकी पाँटिंग म्हणाला…

भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे संघाचे प्रशिक्षक आहेत हे धक्कादायक असल्याचे त्याने रिकी पाँटिंगने म्हटले आहे

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबतील एक खळबळजनक दावा केला आहे. त्याने सांगितले की मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत ३०० दिवस राहिलो असतो आणि याबाबतीत आयपीएलदरम्यान काही लोकांशी बोलणे देखील झाले होते. पण ज्या लोकांशी माझे बोलणे झाले होते तेच लोकं याचा मार्ग शोधत होते की मी प्रशिक्षक कसा बनू शकत नाही. असा खळबळजनक दावा पाँन्टिंगने केला आहे. सोबतच भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे संघाचे प्रशिक्षक आहेत हे धक्कादायक असल्याचे त्याने म्हटले. राहुल द्रविडने आता त्याच्या परिवाराला वेळ द्यायला हवा होता असे पाँटिंगने सांगितले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाँटिंगने सांगितले की, “मला धक्का बसला आहे की द्रविडने प्रशिक्षकपद स्विकारले. मी कित्येक लोकाकंडून ऐकले आहे की तो भारतीय १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक असताना खूप खुष होता. मला त्याच्या कौटुंबिक जीवनाबद्दल जास्त काही माहित नाही. पण त्याची मुले अजून छोटी आहेत”.

“आयपीएलच्या दरम्यान मला कित्येक लोकांशी मुख्य प्रशिक्षक बनण्याबाबत बोलणे झाले होते. ज्य़ांच्य़ा सोबत माझे बोलणे झाले होते ते मला प्रशिक्षक बनवण्यासाठी उत्सुक होते. मी भारतीय संघाचा प्रशिक्षक बनावे असे त्यांना वाटत होते. यावर मी सर्वात आधी उत्तर दिले की मी संघाला वेळ देऊ शकत नाही. याचा असा अर्थ नाही की मी आयपीएलमध्ये प्रशिक्षकपद सांभाळणार नाही”. असे पाँटिंगने सांगितले.


हे ही वाचा: http://टी-२० विश्वचषचकानंतर घरी परतले मॅथ्यू हेडन; उर्दूमध्ये ट्वीट करत म्हणाले, पाकिस्तान