घरक्रीडाटी-२० विश्वचषचकानंतर घरी परतले मॅथ्यू हेडन; उर्दूमध्ये ट्वीट करत म्हणाले, पाकिस्तान...

टी-२० विश्वचषचकानंतर घरी परतले मॅथ्यू हेडन; उर्दूमध्ये ट्वीट करत म्हणाले, पाकिस्तान…

Subscribe

पाकिस्तानचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानी संघापासून दूर जाताना ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तानी संघाचे शानदार प्रदर्शन पहायला मिळाले होते. पाकिस्तानने उपांत्य फेरीपर्यंत देखील मजल मारली होती. मात्र विश्वचषकात एकही सामना पराभूत न झालेल्या पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत चितपट केले. दरम्यान आता बाबर आझमचा पाकिस्तानी संघ बागंलादेश दौऱ्यावर आहे, तिथे शुक्रवारी पाकिस्तान पहिला टी-२० सामना खेळणार आहे. अशातच पाकिस्तानचे प्रशिक्षक मॅथ्यू हेडन यांनी पाकिस्तानी संघापासून दूर जाताना ट्विटच्या माध्यमातून माझे हृदय पाकिस्तानी संघासोबत ढाकाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेडन यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “नमस्ते पाकिस्तान, मी ब्रिस्बेनमध्ये विलगीकरण सेंटरमध्ये माझे आइसोलेशन पूर्ण करत आहे. पण माझे हृदय ढाका येथे पाकिस्तानी क्रिकेटच्या सर्व खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफ सोबत आहे. माझ्या शुभेच्छा पाकिस्तानी संघासोबत आहेत. वेल डन बॉइज, पाकिस्तान जिंदाबाद”.

- Advertisement -

५० वर्षीय मॅथ्यू हेडन यांनी ऑस्ट्रेलियासाठी १०३ कसोटी सामन्यांत ५०.७३ च्या सरासरी नुसार ८६२५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी ३० शतकीय आणि २९ अर्धशकतीय पारी खेळल्या आहेत. तर १६१ एकदिवसीय सामन्यात हेडन यांनी ४३.८० च्या सरासरीने ६१३३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात हेडन यांनी १० शतके आणि ३६ अर्धशतके झळकावली आहेत. सोबतच ९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा: IND vs NZ : स्टेडियममध्ये एवढे प्रेक्षक कसे बोलावू शकता ?; रांची टी-२० सामन्याविरोधात याचिका दाखल


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -