Women’s Big Bash League: स्मृती मंधानाची शतकीय पारी; लीगमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय

महिला बिग बॅश लीगमध्ये स्मती मंधानाने शानदार शतकीय खेळी केली

महिला बिग बॅश लीगमध्ये स्मृती मंधानाने शानदार शतकीय खेळी केली. तिने नाबाद ११४ धावांची खेळी केली, तिची ही खेळी या लीगमधील सगळ्यात मोठी व्यक्तिगत खेळी ठरली आहे. स्मृतीच्या अगोदर एशले गार्डनरने पण बिग बॅशमध्ये ११४ धावांची शतकीय खेळी केली होती. स्मृती बिग बॅशमध्ये शतक करणारी पहिली भारतीय फलंदाज ठरली आहे. तिच्या पाठोपाठ हरमनप्रीत कौरने देखील या सामन्यात अर्धशतकीय खेळी केली. लक्षणीय बाब म्हणजे स्मृतीने शतकीय पारी खेळून देखील आपल्या संघाला विजय देण्यात अपयशी ठरली. मंधानाचा संघ सिडनी या सामन्यात फक्त ४ धावांनी पराभूत झाला.

सिडनी आणि मेलबर्नच्या सामन्यादरम्यान एकूण ३४६ धावा झाल्या आणि यातील १९५ धावा फक्त स्मृती आणि हरमनप्रीत दोघींच्या नावावर आहेत. दोघीही या सामन्यात नाबाद राहिल्या. मेलबर्नकडून खेळणाऱ्या हरमनप्रीतने ५५ चेंडूत ८१ धावा केल्या. तिच्या शानदार खेळीच्या बदल्यात मेलबर्नच्या संघाने सिडनीला १७६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनीचा संघ १७१ धावापर्यंतच पोहचू शकला बदल्यात सिडनीच्या संघाला ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. स्मृती मंधानाने ६४ चेंडूत ११४ धावा बनवल्या पण तिच्या व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही.

फलंदाजीद्वारे शानदार खेळी केलेल्या हरमनप्रीतने गोलंदाजीत देखील कमाल केली, तिने शेवटच्या षटकात सहजरित्या १३ धावांचा बचाव केला. तर हरमनप्रीतने सामन्याच्या शेवटच्या षटकात फक्त ८ धावा दिल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मेलबर्न गुणतालिकेत पहिल्या स्थानावर

सिडनीविरूध्दच्या विजयासोबतच मेलबर्नच्या संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानालर मजल मारली आहे. मेलबर्नच्या संघाने १२ सामन्यातील ८ सामन्यात विजय मिळवून १८ अंक मिळवले आहेत. तर १२ सामन्यात १६ अंकासह पर्थचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या या हंगामात मेलबर्नचे पहिले स्थान जवळपास निश्चित राहणार आहे. मेलबर्नच्या संघाने याअगोदरच उपांत्य फेरी गाठली आहे. तर सिडनीच्या संघाने १२ मधील फक्त ३ सामने जिंकले आहेत आणि ८ अंकासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. सिडनीच्या संघाचे उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.


हे ही वाचा: Video : कॅमेरून ग्रीनच्या जोरदार बाऊन्सरवर फलंदाजाचे हेलमेट गुल; फलंदाज थोडक्यात वाचला