घरक्रीडा६ महिन्याच्या विश्रांतीनंतर इंग्लंडच्या ऑलराउंडर खेळाडूची एन्ट्री; भारतासोबत सर्वच संघाची वाढली चिंता

६ महिन्याच्या विश्रांतीनंतर इंग्लंडच्या ऑलराउंडर खेळाडूची एन्ट्री; भारतासोबत सर्वच संघाची वाढली चिंता

Subscribe

जगातील सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर म्हणून ओळख असलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स ६ महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरूवारी क्वीन्सलंडच्या गोल्ड कोस्टच्या मोट्रिको मैदानावर पहिल्यांदाच ट्रेनिंग करताना समोर आला

जगातील सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर म्हणून ओळख असलेला इंग्लंडचा बेन स्टोक्स ६ महिन्यांच्या विश्रांतीनंतर गुरूवारी क्वीन्सलंडच्या गोल्ड कोस्टच्या मोट्रिको मैदानावर पहिल्यांदाच ट्रेनिंग करताना समोर आला. तो इंग्लंडच्य़ा एशेजच्या कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या संघातील खेळाडूंसोबत सराव करत होता. त्यावेळी बेन स्टोक्स, जो रूट आणि स्टुअर्ट ब्रॉडसारखे अनुभवी खेळाडू पहायला मिळाले. हे खेळाडू एशेजची तयारी करण्यासाठी लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत. बेन स्टोक्स सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकात खेळायला नसल्यामुळे संघाला त्याची कमी जाणवेल अशी चर्चा होती. मात्र विश्वचषकाच्या सुरूवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून स्टोक्सची कमी भासू दिली नव्हती. मात्र बुधवारी झालेल्या झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला.

स्टोक्स ६ महिने क्रिकेटपासून होता दूर

बेन स्टोक्सने अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे क्रिकेटमधून आराम घेतला होता. याच्या नंतर त्याचा ६ महिन्यानंतर संघात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

इंग्लंडच्या संघाला आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरूध्द पराभवाचा सामना करावा लागला. परिणामी इंग्लंडच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले त्यामुळे एशेजसाठी निवड झालेले खेळाडू एशेजसाठी जाणाऱ्या संघासोबत जोडले जाणार आहेत. यामध्ये जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, क्रिस वोक्स आणि मार्क वुड हे खेळाडू दुबईवरून ऑस्ट्रेलियाला जातील.

- Advertisement -

बेन स्टोक्सने ७१ कसोटी सामन्यात ४६३१ धावा केल्या आहेत आणि १६३ बळी घेतले. तर १०१ एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर २८७१ धावा आणि ७४ बळींची नोंद आहे. तर ३४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्टोक्सने ४४२ धावा करून १९ बळी पटकावले आहेत.

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -