IND vs NZ : भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान

भारत विरूध्द न्यूझीलंडच्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले आहे.

सध्या सुरू असलेल्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या सामन्यात मार्टिन गुप्टील आणि मार्क चॅपमनच्या अचूक खेळीच्या बदल्यात न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्टीलने सर्वाधिक ४२ चेंडूत ७० धावा केल्या त्याच्या पाठोपाठ मार्क चॅपमनने ५० चेंडूत ६३ धावांची सावध खेळी करून संघाला अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहचवले. बदल्यात न्यूझीलंडच्या संघाने २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात सुरूवातीपासूनच धिम्या गतीची झाली पण गुप्टीलने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला साजेशी धावसंख्या उभारता आली.

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला २० षटकांत १६४ धावांपर्यंत रोखले. भारतीय गोलंदाजांनी डावाच्या सुरूवातीपासूनच आक्रमक मारा करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखून ठेवला. न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स आणि डेरी मिचेलला खातेही न उघडता माघारी पाठवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनला प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले. तर दिपक चाहर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी १-१ बळी पटकावून पहिल्या डावात भारतीय संघाची पकड मजबूत करण्यास हातभार लावला.

दोन्हीही संघ नव्या कर्णधाराच्य़ा नेतृत्वात सामना खेळत आहेत. भारतीय संघ रोहित शर्माच्या तर न्यूझीलंडचा संघ टिम साउदीच्या नेतृत्वात खेळत आहे. भारतीय संघाला आपल्या जुन्या आठवणी विसरून नवा कमबॅक करण्याची संधी असणार आहे. तर विश्वचषकातील उपविजेता न्यूझीलंड आपल्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करेल.


हे ही वाचा: http://फायनलमध्ये पोहचून भारतीय तिरंदाजांनी पक्की केली पदक