Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी या ७ खेळाडूंची घोषणा; क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिली माहिती

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये साजेशी पदके जिंकल्यानंतर भारत सरकारने आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठीची तयारी सुरू केली आहे

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये साजेशी पदके जिंकल्यानंतर भारत सरकारने आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ साठीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान सोबतच क्रीडा मंत्रालयाने आपल्या टीम मिशन ऑलिम्पिक सेलसाठी ७ दिग्गज आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स खेळाडूंचा समावेश केला आहे. तर या खेळाडूंच्या मार्गदर्शनातून नवीन चॅम्पियन तयार केले जाणार आहेत. याबाबत खुद्द क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले की, आम्ही पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या तयारीला आणखी मजबूत करत आहोत. त्यामुळेच ७ दिग्गज आंतरराष्ट्रीय भारतीय अॅथलेटिक्सना मिशन ऑलिम्पिकच्या सेलमध्ये समाविष्ट केले आहे.

अनुराग ठाकूर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, सर्व सातही खेळाडूंचा अनुभव आम्हाला चॅम्पियन-अॅथलीट तयारीच्या प्रणालीसाठी मदतशीर असेल. तर क्रीडामंत्र्यांनी दुसऱ्या ट्विटच्या माध्यमातून त्या माजी ७ खेळाडूंच्या नावाचा उल्लेख केला ज्यांचा ऑलिम्पिक सेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये दिग्गज माजी फुटबॉल खेळाडू बायचुंग भुतिया, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज, हॉकीपटू सरदार सिंग, वीरेन रस्किन्हा, नेमबाज अंजली भागवत, टेबल टेनिसपटू मोनालिसा बरुआ मेहता आणि बॅडमिंटन स्टार तृप्ती मुरूंगडे हे खेळाडू आहेत.

काय आहे मिशन ऑलिम्पिक सेल

केंद्र सरकारकडून २०१६ मध्ये देखील मिशन ऑलिम्पिकच्या सेलची निर्मिती करण्यात आली होती. त्याचे नाव टॉप्स आहे. या मिशनच्या माध्यमातून अॅथलेटिक्सचा सराव, बोर्डिंग, लॉजिंगचा सराव केला जातो. सोबतच चांगल्या सरावासाठी खेळाडूंना विदेशात देखील पाठवले जाते. मागील वर्षी कुस्तीपटू बजरंग पुनियाला देखील विदेशात पाठवण्यात आले होते. दरम्यान या अभियांतर्गत त्या प्रतिभाशाली खेळाडूंचा शोध घेतला जाईल जे खेळाडू मुख्य प्रवाहातून बाहेर गेले आहेत.


हे ही वाचा: http://BWF World Tour Finals : पी.व्ही सिंधू आणि किदांबी श्रीकांतची विजयी सलामी