Rinku Singh ची वादळी खेळी एका धावेमुळे वाया; लखनऊ हारता हारता जिंकली

IPL 2023 मध्ये रिंकू सिंह याची कामगिरी दमदार राहिली आहे. रिंकू सिंहने अशीच एक तुफानी खेळी करत केकेआरला विजयाच्या जवळ आणलं होतं. परंतु एका धावेमुळे लखनऊ हारता हारता जिंकलं.

Sports news IPL 2023 KKR Vs LSG sensational win by 1 run on Kolkata knight riders and qualify for playoffs Rinku Singh
Sports news IPL 2023 KKR Vs LSG sensational win by 1 run on Kolkata knight riders and qualify for playoffs Rinku Singh

Kolkata Knight Riders Vs Lucknow Super Giants: IPL 2023 मध्ये रिंकू सिंह याची कामगिरी दमदार राहिली आहे. रिंकू सिंहने अशीच एक तुफानी खेळी करत केकेआरला विजयाच्या जवळ आणलं होतं. परंतु एका धावेमुळे लखनऊ हारता हारता जिंकलं. ( Sports news IPL 2023 KKR Vs LSG sensational win by 1 run on Kolkata knight riders and qualify for playoffs Rinku Singh )

केकेआरची बॅटिंग

केकेआरची 177 धावांचं पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली. जेसन रॉय आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी 61 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर केकेआरचा 61 स्कोअर असातना व्यंकटेश 24 धावांवर आऊट झाला. त्यानंतर लखनऊने कमबॅक करत केकेआरला ठराविक अंतराने झटके दिले.

केकेआरने एकामागोमाग एक विकेट्स गमावल्या. नितीश राणा 8, जेसन रॉय 45, रहनामुल्लाह गुरुबाद 10, आंद्रे रसेल 7, शार्दुल ठाकूर 3 आणि सुनिल नारायण 1 केकेआरच्या या फलंदाजांनी वरीलप्रमाणे धावा केल्या. मात्र, त्यानंतर आणि दरम्यान रिंकू सिंहने एक बाजू लावून धरली.

रिंकूने 19 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर सलग 3 चौकार ठोकले. मग 2 धावा घेत स्वत: कडे स्ट्राईक ठेवली. त्यानंतर पाचव्या बॉलवर सिक्स ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. तर सहावा बॉल डॉट राहिला. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती.

20 व्या ओव्हरमधील थरार

वैभव अरोरा याने यश ठाकूर याच्या बॉलिंगवर रिंकूला एक धाव काढून स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकूला वाईड बॉल टाकला. त्यामुळे आता 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज होती. रिंकूने दुसऱ्या बॉलवर धाव घेतली नाही. तिसऱ्या बॉलवरही रिंकूने एकेरी धावेसाठी नकार दिला. यशने चौथा बॉल वाईड टाकला. त्यामुळे आता 3 बॉलमध्ये 18 धाव्या हव्या होत्या.

रिंकूने चौथ्या बॉलवर खणखणीत सिक्स ठोकला. आता 2 बॉलमध्ये 12 धावा राहिल्या. रिंकूने पाचव्या बॉलवर चौकार ठोकला. त्यामुळे शेवटच्या बॉलवर 8 धावा पाहिजे होत्या. रिंकूने शेवटच्या बॉलवरही सिक्स खेचला. मात्र, रिंकूचे प्रयत्न अवघ्या 1 रनसाठी अपुरे ठरले. रिंकूने 33 ब़ॉलमध्ये नाबाद 67 धावांची खेळी केली. रिंकूने या खेळीत 4 सिक्स आणि 6 चौकार ठोकले.

( हेही वाचा: IPL 2023 DC vs CSK : चेन्नईचा दिल्लीवर 77 धावांनी विजय, प्ले ऑफचे तिकीट केले पक्के )

केकेआरकडून रिंकूशिवाय जेसन रॉयने चांगली खेळी केली. जेसन रॉयने 28 बॉलमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या. पहिल्या विकेटसाठी व्यंकटेश अय्यरच्या साथीने 61 धावांनी भागीदारी केली होती. मात्र, कोलकाताचा संघ विजय मिळवण्यात अपयशी ठरला.