Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट कोहली आणि गौतम गंभीर भरणार नाहीत दंड; सत्य जाणून बसेल धक्का

विराट कोहली आणि गौतम गंभीर भरणार नाहीत दंड; सत्य जाणून बसेल धक्का

Subscribe

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर कारवाई करत दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. पण आता समोर आलेल्या नवीन अहवालानुसार विराट आणि गौतमला हा दंड स्वतःच्या खिशातून भरावा लागणार नाही.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कठोर कारवाई करत दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. पण आता समोर आलेल्या नवीन अहवालानुसार विराट आणि गौतमला हा दंड स्वतःच्या खिशातून भरावा लागणार नाही. ( Sports news IPL 2023 RCB and lucknow super giants Virat Kohli and Gautam gambhir slapped with Massive fines after fight )

IPL 2023 साठी विराट कोहलीला एकूण 15 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जे RCB विराट कोहलीला देणार आहे. आरसीबीला या आपीएलच्या हंगामात किमान 14 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे विराटचे एका सामन्याचे सुमारे 1 कोटी सात लाख रुपये होतात. त्यामुळे विराट कोहलीला जवळपास एक कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

परंतु क्रिकबझशी बोलताना आरसीबीच्या एका सूत्राने सांगितले की, खेळाडूंनी संघासाठी सर्वस्व पणाला लावले आहे, अगदी त्यांचे शरीरही, आणि आम्ही त्याचा आदर करतो. संस्कृती म्हणून आम्ही त्यांच्या पगारातून दंड कापत नाही. यावरून विराटला स्वत:च्या खिशातून कोणताही दंड भरावा लागणार नाही, हे स्पष्ट होते. सर्व खर्च फ्रँचायझी उचलणार आहे.

गौतम गंभीरच्या बाबतीतही तेच समिकरण आहे. मात्र, त्याच्या आयपीएल मानधनाबाबत कोणालाच माहिती नाही. गंभीरला प्रत्येक सामन्यासाठी 25 लाख रुपये मिळतात असं म्हटलं जातं.

नेमकं प्रकरण काय? 

- Advertisement -

RCB आणि लखनऊ यांच्यातील मॅच झाल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. दोन्ही संघातील इतर खेळाडूंशी मध्यस्थी केल्यानं वाद वाढला नाही. आरसीबीने पहिल्यांदा ब‌ॅटिंग करताना 127 धावा केल्या होत्या. लखनऊच्या संघाचा खेळाडू बाद झाल्यानंतर विराट कोहली आक्रमकपणे जल्लोष करत होता. यामुळे गौतम गंभीरच्या रागाचा पारा चढला होता.

( हेही वाचा: अश्विन-प्रितीच्या प्रेमाची गोष्ट : राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू खेळाडू शाळकरी वयातच पडला होता प्रेमात

आरसीबीने दिलेल्या 127 धावांच्या आव्हानाचा पाठवलाग करताना लखनऊच्या संघाला 20 ओव्हर्समध्ये 108 धावा करता आल्या. मॅच संपल्यानंतर विराट कोहली सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता. यावेळी लखनऊचा गोलंदाड नवीन उल-हक विराट कोहलीशी वाद घालताना दिसून आला. यावेळी ग्लेन मॅक्सवेलने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विराट कोहली तिथे आला आणि वाद वाढला. गंभीरला देखील त्याच्या संघातील खेळाडूंनी रोखण्याचा प्रयत्न केला. आरसीबी आणि लखनऊच्या खेळाडूंनी दोन्ही खेळाडूंना बाडूल केलं त्यामुळे वाद वाढला नाही.

- Advertisment -