Eco friendly bappa Competition
घर क्रीडा खेळात "राजकारणाचा खेळ' नको; खासदार उदयनराजे भोसले

खेळात “राजकारणाचा खेळ’ नको; खासदार उदयनराजे भोसले

Subscribe

गेल्या काही वर्षात खेळाडूंची शिफारस करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. नियमित सराव व उत्तम खेळाडूंवर याचा परिणाम होतो. अशा प्रकारांमुळे चांगल्या खेळांडूमध्ये नैराश्य येते. हे कुठे तरी थांबायला हवे. ऑलिम्पिक स्पर्धेत आपले खेळाडू जातात. पण मोजक्याच पदकांची कमाई होते. त्याचवेळी छोटे छोटे देश अनेक पदकांवर आपला ठसा उमटवतात. त्याचा विचार आपण करायला हवा, असे खासदार भोसले यांनी सांगितले. 

कोल्हापूरः गेल्या काही वर्षात खेळात राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे खंत वाटते. मुळात खेळात राजकारण यायलाच नको, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा खासदार भोसले यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. खासदार भोसले म्हणाले, गेल्या काही वर्षात खेळाडूंची शिफारस करण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. नियमित सराव व उत्तम खेळाडूंवर याचा परिणाम होतो. अशा प्रकारांमुळे चांगल्या खेळांडूमध्ये नैराश्य येते. हे कुठे तरी थांबायला हवे. ऑलिम्पिक स्पर्धेत आपले खेळाडू जातात. पण मोजक्याच पदकांची कमाई होते. त्याचवेळी छोटे छोटे देश अनेक पदकांवर आपला ठसा उमटवतात. त्याचा विचार आपण करायला हवा, असे खासदार भोसले यांनी सांगितले.

- Advertisement -

पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 45 संघ आणि 900 हून अधिक पैलवान या स्पर्धेत उतरले होते. या स्पर्धेची सुरुवात 1961साली झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अनेक मल्लांनी या महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे.

नांदेडचा पैलवान शिवराज राक्षे याने ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड ला काही मिनिटातंच थेट चितपट करत विजय मिळवला. त्याचे सर्वस्तरातून कौतुक झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राक्षेचा सत्कार केला. महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेतील वाद हे अयोग्य आहेत. खेळाच्या परिषदेत असे वाद होता कामा नयेत. खेळाच्या परिषेदत केवळ खेळच झाला पाहिजे, अशा शब्दांत  शरद पवार यांनी हा वाद करणाऱ्यांचे कान टोचले.

- Advertisement -

कुस्ती खेळणारे पैलवान हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतात. त्यांना पाठबळ द्यायलाच हवे. त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या रक्केमत वाढ केली यासाठी राज्य शासनाचे कौतुकच करायला हवे. मात्र राक्षेने या स्पर्धेवर समाधान मानायला नको. त्याने अजून पुढे प्रगती करायला हवी. महाराष्ट्र केसरीनंतर राष्ट्रीय व आशिया स्पर्धेत उत्तुंग कामगिरी करायला हवी. खाशाबा जाधव यांच्यानंतर कोणीच ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत पोहोचलेले नाही. राक्षेने भारतासाठी ऑलिम्पिकचे पदक आणावे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -