घरक्रीडाWTA Finals : गार्बाईन मुगुरुझा बनली चॅम्पियन; फायनलमध्ये अॅनेट कोन्तावेइटचा सरळ सेटमध्ये...

WTA Finals : गार्बाईन मुगुरुझा बनली चॅम्पियन; फायनलमध्ये अॅनेट कोन्तावेइटचा सरळ सेटमध्ये केला पराभव

Subscribe

स्पेनच्या गार्बाईन मुगुरूझाने अंतिम फेरीत अॅनेट कोन्तावेइटचा सरळ सेटमध्ये पराभव करून वुमन्स टेनिस असोसिएशनच्या फायनल्स टेनिस स्पर्धेचा किताब जिंकला आहे

स्पेनच्या गार्बाईन मुगुरूझाने अंतिम फेरीत अॅनेट कोन्तावेइटचा सरळ सेटमध्ये पराभव करून वुमन्स टेनिस असोसिएशनच्या फायनल्स टेनिस स्पर्धेचा किताब जिंकला आहे. स्पेनच्या २८ वर्षीय मुगुरूझाने एस्टोनियाच्या कोन्तावेइटचा ६-३, ७-५ अशा फरकाने पराभव करून तिच्या करियरमधील या स्पर्धेचा पहिला किताब आपल्या नावावर केला. मेक्सिकोला आपल्या घरासारखी म्हणणाऱ्या मुगुरूझाने या देशाकडून खेळताना १४ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये सलग दोन विजेतेपद पटकावणारी मुगुरुझा ही स्पेनची पहिली खेळाडू आहे जिने मॉन्टेरे, मेक्सिको येथे महिलांच्या सीझन-एंड स्पर्धा जिंकल्या आहेत.

यापूर्वी स्पेनच्या अरांतजा सांचेझ विकारिओ ही दोन वेळा उपविजेता राहिली आहे. २०१४ मध्ये सेरेना विल्यम्सनंतर ही स्पर्धा जिंकणारी पहिली जगातील नंबर एक सर्वात वयस्कर खेळाडू आहे. २०१५ डब्ल्यूटीएच्या फायनलमधील उपांत्य फेरीत जागा मिळवणारी मुगुरुझाची ही २०१७ नंतरची तिची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ती आता जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर राहून या हंगामाचा शेवट करेल. तर फायनलमध्ये पराभूत होऊनही कोन्तावेइट या वर्षी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे.

- Advertisement -

जोकोविच उपांत्य फेरीत फेडररचा विक्रम

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविचने एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आंद्रे रुबलेव्हचा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर कॅस्पर रूडदेखील मोठ्या सामन्यात विजय मिळवण्यात यशस्वी झाला. जगातील अव्वल आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत रॉजर फेडररच्या विक्रमी सहा विजेतेपदांची बरोबरी करण्याचे आव्हान असलेल्या जोकोविचने रुबलेव्हचा ६-३, ६-२ असा पराभव केला.


हे ही वाचा: IND vs NZ : नवा सामना नवा कर्णधार ! न्यूझीलंडच्या प्रत्येक टी-२० मध्ये नवा कर्णधार; साउदी नंतर कोण ?

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -