घरक्रीडाहिमा दासनंतर धावपटू मोहम्मद अनासचे यश

हिमा दासनंतर धावपटू मोहम्मद अनासचे यश

Subscribe

भारताचा धावपटू मोहम्मद अनासने झेक रिपब्लीक येथे नवा राष्ट्रीय रेकॉर्ड सेट करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच भारताच्या हिमा दासने फिनलँडमध्ये पार पडलेल्या अंडर २० ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्या पाठोपाठ आता भारताचा धावपटू ‘मोहम्मद अनास याहीया’ने देखील झेक रिपब्लीक येथे झालेल्या ४०० मीटर शर्यतीत अप्रतिम कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे मोहम्मदने ४५.२४ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत एक नवा राष्ट्रीय विक्रमही सेट केला आहे.

- Advertisement -

याआधीही तोडला आहे अनसने रेकॉर्ड

अनसने सर्वात आधी जून २०१६ मध्ये ‘पोलंड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप’ मध्ये ४५.४० सेकंदांत ४०० मीटर अंतर पार करत राष्ट्रीय विक्रम मोडला होता. यासोबतच तो ऑलिंपिकमध्ये जाणारा तिसरा भारतीय ठरला होता. त्याच्या आधी भारताचे फ्लाईंग सिख मिल्खा सिंग आणि के.एम. बीनू यांनी ४०० मीटर शर्यतीत अप्रतिम कामगिरी करत ऑलिंपिकमध्ये प्रवेश मिळवला होता. २०१६ नंतर अनसने काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ४५.३१ सेकंदांत ४०० मीटर अंतर कापत पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला होता. आता पुन्हा ४०० मीटरचे अंतर अवघ्या ४५.२४ सेकंदात कापत अनसने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.

Flying Sikh
फ्लाईंग सिख मिल्खा सिंग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -