घरक्रीडा'मला जबरदस्तीने स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा मान्य करायला लावला'

‘मला जबरदस्तीने स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा मान्य करायला लावला’

Subscribe

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मला जबरदस्ती गुन्हा मान्य करायला लावला, असा खळबळजनक आरोप माजी क्रिकेटपटू श्रीसंतने केला आहे.

‘मला जबरदस्तीने स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा मान्य करायला लावला’, असा खळबळजनक आरोप भारताचा माजी क्रिकेटपटू शांताकुमारन श्रीसंतने दिल्ली पोलिसांवर केला आहे. २०१३ मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत दोषी ठरला होता. त्यामुळे त्याला दिल्ली पोलीसांनी मुंबई येथून अटक केली होती. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतवर आजीवन बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाचे दिलेले आदेश चुकीचे असल्याचे श्रीसंतने म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

२०१३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज शांताकुमारन श्रीसंतने न्यायालयात स्पॉट फिक्सिंगमध्ये आपला सहभाग होता, अशी कबुली दिली होती. त्यामुळे न्यायमुर्ती अशोक भूषण आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने श्रीसंतला दोषी ठरवत त्याच्यावर बंदी आणली होती. यासोबतच १० लाख रुपये दंड देखील ठोठावला होता. ‘सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा होता आणि स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा माझ्याकडुन जबरदस्तीने वदवून घेतला होता’, असा आरोप श्रीसंतने दिल्ली पोलिसांवर केला आहे.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाला श्रीसंत?

श्रीसंत म्हणाला की, ‘मी स्पॉट फिक्सिंग केल्याचा कुठलाही पुराव नव्हता. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेला कारवाई चुकीची आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत. जेव्हा या प्रकरणाची चौकशी सुरु होती, तेव्हा मला दिल्ली पोलिसांनी धमकी दिली होती. तुझ्यासोबचत तुझ्या कुटुबियांनाही आम्ही त्रास देऊ, असे दिल्ली पोलिसांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी स्पॉट फिंक्सिंगचा आरोप दिल्ली पोलिसांच्या दबावाखाली मान्य केला होता.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -