Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाSreesanth vs Gambhir : लिजेंड्स लीग क्रिकेटमधील वादावादीनंतर श्रीशांतचे गौतमवर 'गंभीर' आरोप

Sreesanth vs Gambhir : लिजेंड्स लीग क्रिकेटमधील वादावादीनंतर श्रीशांतचे गौतमवर ‘गंभीर’ आरोप

Subscribe

सूरत :  बुधवारी (6 डिसेंबर) रात्री खेळल्या गेलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचे दोन दिग्गज खेळाडू एस. श्रीशांत आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर श्रीसंतने एक व्हिडीओ शेअर करताना गौतम गंभीरवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. श्रीशांतच्या म्हणण्यानुसार, भांडखोर स्वभावाचा गौतम गंभीर सामन्यादरम्यान त्याला वारंवार फिक्सर-फिक्सर म्हणत होता. परंतु मी त्याच्या बाजूने एक शब्दही बोलला नव्हतो, तरीही तो अश्लील शिवीगाळही करत होता. (Sreesanth vs Gambhir Sreesanth makes serious allegations against Gautham after controversy in League of Legends cricket)

हेही वाचा – Hindu : दोन लाख हिंदूंचे अस्तित्व धोक्यात; शेजारील देश अर्धा भूभाग हडपण्याच्या तयारीत

- Advertisement -

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज (7 डिसेंबर) दुपारी श्रीशांतने इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितले की, ‘मी त्याच्यासाठी एकही वाईट किंवा अपमानास्पद शब्द वापरलेला नाही. मी फक्त म्हणालो की, काय म्हणताय? काय करत आहेस? खरं तर, मी त्याच्या वक्तव्यावर हसत राहिलो, कारण तो म्हणत होता की तू ‘फिक्सर आहेस, फिक्सर.’ पण गौतम गंभीर नेहमी त्याच्या सहकाऱ्यांशी भांडतो असतो, असा आरोप श्रीशांतने केला आहे.

- Advertisement -

2013 च्या आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी झाल्यामुळे श्रीशांतला अटक करण्यात आली होती. त्याने दीर्घ बंदी भोगली आणि त्यानंतर 2021 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. श्रीशांत सांगितले की, त्याच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे. परंतु याठिकाणी माझी काहीच चूक नव्हती.

काय आहे प्रकरण?

गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्स यांच्यात लिजेंड्स लीग क्रिकेट 2023 मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात गौतम गंभीरने श्रीशांतच्या एक षटकात चौकार आणि षटकार मारले होते. यानंतर मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार बाचाबाची झाली. गौतम गंभीर आणि श्रीशांत एकमेकांकडे पाहात होते.

हेही वाचा – Sugar : साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; उसापासून बनणाऱ्या इथेनॉलवर बंदी

दरम्यान, लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीर इंडिया कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे तर श्रीशांत पार्थिव पटेल याच्या नेतृत्वात गुजरात जायंट्सकडून खेळत आहे. बुधवारी रात्री वादग्रस्त ठरलेला हा सामना इंडिया कॅपिटल्सने 12 धावांनी जिंकला. या विजयात गौतम गंभीरचे अर्धशतक महत्त्वाचे ठरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -