घरक्रीडाथप्पडचा बदला घे, श्रीशांतला चाहत्यांचा सल्ला

थप्पडचा बदला घे, श्रीशांतला चाहत्यांचा सल्ला

Subscribe

श्रीशांत आणि हरभजनच्या थप्पड प्रकरणानंतर आता श्रीशांतच्या नव्या लुकवरून लोक संदर्भ लावून ट्रोल करत आहेत.

क्रिकेटर श्रीशांत पुन्हा नव्यानं चर्चेत आला आहे. पण यावेळी वाईट गोष्टीसाठी तर चक्क त्यानं कमावलेल्या बॉडीसाठी. मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर श्रीशांतचं क्रिकेट करिअर संपुष्टातच आलं. मात्र नव्या आशेसह त्यानं आपलं करिअर चित्रपटात अॅक्टिंग करून सुरु केलं. बॉलीवूडच्या ‘अक्सर २’ मधून श्रीशांतनं चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आता लवकरच श्रीशांत कन्नड चित्रपटात हिरोच्या भूमिकेत त्यांच्या चाहत्यांना दिसणार आहे. ‘कॅम्पागोडा – २’ या कन्नड चित्रपटासाठी श्रीशांतनं स्वतःमध्ये पूर्ण बदल घडवून आणले आहेत. त्याचा व्हायरल झालेला हा फोटो पाहून लगेचच त्याच्या चाहत्यांनी आपल्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे.

श्रीशांतमध्ये घडला संपूर्ण बदल

आता जर श्रीशांतला त्याच्या नव्या अवतारात पाहाल, तर त्याला ओळखतादेखील येणार नाही. जिममध्ये मेहनत करून श्रीशांतनं अगदी हिरोप्रमाणं पिळदार शरीरयष्टी बनवली आहे. श्रीशांतनं आपला फोटो पोस्ट केल्यानंतर श्रीशांतला हरभननं मारलेल्या थपडेचा संदर्भ देत लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

हरभजनने श्रीशांतच्या थोबाडीत मारल्याचा किस्सा

मोहालीमध्ये २००८ च्या आयपीएल सामन्यामध्ये बॉलर हरभजन सिंगनं श्रीशांतच्या श्रीमुखात लगावल्याचा किस्सा आजही सगळ्यांना परिचित आहे. हरभजनने मारलेल्या या थपडेनंतर श्रीशांतचे रडतानाचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. हे दोन्ही खेळाडू जरी विसरले असले तरीही, श्रीशांतच्या नव्या लुकनंतर त्याच्या चाहत्यांनी हरभजन आणि श्रीशांतच्या या आठवणीचा संदर्भ देऊन ट्रोल करायला सुरुवात केली आहे. या फोटोवर अतिशय मजेदार कमेंट्स येत आहेत. आता आपल्याला मारलेल्या थपडेचा बदला घे असाही सल्ला श्रीशांतला देण्यात येत आहे.

- Advertisement -

#sreesanth transfrmation

A post shared by LAUGHING_CANCER_? (@laughing_cancer_) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -