घरIPL 2020RCB vs SRH : हैदराबादने बंगळुरूला १२० धावांवर रोखले 

RCB vs SRH : हैदराबादने बंगळुरूला १२० धावांवर रोखले 

Subscribe

बंगळुरूला सामना जिंकत प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला केवळ १२० धावांवर रोखले. प्ले-ऑफ गाठण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. बंगळुरूचा संघ सध्या १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून हा सामना जिंकत त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. दुसरीकडे हैदराबादचा संघ १२ सामन्यांत १० गुणांसह सातव्या स्थानावर असून त्यांना हा सामना जिंकणे जवळपास अनिवार्यच आहे.

आज शारजाह येथे होत असलेल्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बंगळुरूच्या डावाची अडखळती सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज संदीप शर्माने देवदत्त पडिक्कल (५) आणि कर्णधार विराट कोहली (७) यांनी खेळपट्टीवर फार काळ टिकू दिले नाही. मात्र, जॉश फिलिपे आणि एबी डिव्हिलियर्सने मिळून बंगळुरूचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली.

- Advertisement -

शाहबाझ नदीमने एबी डिव्हिलियर्सला २४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तर राशिद खानच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात फिलिपे बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यानंतर वॉशिंग्टन सुंदर (२१) आणि गुरकीरत सिंग (नाबाद १५) यांनी काही चांगले फटके मारले. त्यामुळे बंगळुरूने २० षटकांत ७ बाद १२० अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने २-२ विकेट घेतल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -