घरक्रीडाIPL 2021 : SRH vs DC सनरायझर्स हैद्राबादचा टी नजराजन Covid-19 पॉझिटीव्ह

IPL 2021 : SRH vs DC सनरायझर्स हैद्राबादचा टी नजराजन Covid-19 पॉझिटीव्ह

Subscribe

बोर्ड फॉर कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) ने सनरायझर्स हैद्राबादचा टी नटराजन या वेगवान गोलंदाजाला Covid-19 ची लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्याच्या संपर्कातील सहा जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. आजच्या SRH दिल्ली कॅपिटल्ससोबतच्या लढतीआधीच हे वृत्त समोर आले आहे. बीसीसीआयसोबतच इंडियन प्रिमिअर लिगनेही अधिकृत पत्रक जाहीर करत नियमित RT-PCR चाचणीत टी नटराजन कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर टी नटराजनने स्वतःला उर्वरीत संघापासून आयसोलेट करून घेतले आहे. आतापर्यंत टी नटराजनला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत.

- Advertisement -

आयपीएलकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आजचा सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील सामना खेळला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे हा सामना होणार आहे. वैद्यकीय पथकाने टी नटराजनच्या संपर्कातील सहा जणांना आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये विजय शंकर, विजय कुमार ( संघ व्यवस्थापक), श्याम सुंदर जे (फिजिओथेरापिस्ट), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), पेरियासॅमी गणेसन (नेट बॉलर) आदींना आयसोलेट करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आयपीएलच्या सामन्यांसाठी अतिशय कडक नियमावली आणि व्यवस्थापन करूनही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह येण्याचे प्रकरण समोर आले आहे. याआधीच बीसीसीआयने कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आयपीएल २०२१ चा आधीचा हंगाम तात्पुरता रद्द केला होता. अनेक चर्चा आणि बैठकानंतर आयपीएल व्यवस्थापनाने आयपीएलचा उर्वरीत हंगाम हा दुबईला पुर्ण करण्याचा निर्णय घेतला. यंदाचा म्हणजे आयपीएल २०२१ चा उर्वरीत हंगाम हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या सामन्याच्या निमित्ताने रविवारपासून सुरू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2021: आता स्टेडियममध्ये बसून घेता येणार लाईव्ह मॅचचा आनंद; BCCI चा निर्णय


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -