घरक्रीडाSRH VS GT : मिलर-सुदर्शनची स्फोटक खेळी; गुजरातकडून हैदराबादचा सात विकेट्सने पराभव

SRH VS GT : मिलर-सुदर्शनची स्फोटक खेळी; गुजरातकडून हैदराबादचा सात विकेट्सने पराभव

Subscribe

अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीगच्या 12 व्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबाद संघाचा सात विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादने आठ विकेट्स गमावत 162 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने पाच चेंडू आणि तीन विकेट्स राखून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. गुजरातकडून साई सुदर्शनने 45, तर डेव्हिड मिलरने नाबाद 44 धावांची खेळी खेळली. (SRH VS GT Explosive innings by David Miller and Sai Sudarshan Hyderabad lost to Gujarat by seven wickets)

हेही वाचा – Vijay Shivtare : अजित पवारांचा ब्रह्मराक्षस उल्लेख करत कार्यकर्त्याचं माघार घेणाऱ्या शिवतारेंना खरमरीत पत्र

- Advertisement -

सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. मयंक अग्रवाल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो 17 चेंडूत 16 धावा करून अजमतुल्ला ओमरझाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर ट्रॅव्हिस हेडला नूर अहमदने क्लीन बोल्ड केले. ट्रॅव्हिस हेड 14 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माही शुबमन गिलच्या हाती झेल देत बाद झाला. तो फक्त 20 धावांच करू शकला.

एडन मार्कराम 17 आणि हेनरिक क्लासेन 24 धावा करून बाद झाला. क्लासेनने आपल्या खेळीत एक चौकार आणि दोन षटकार ठोकले. शाहबाज अहमदने 20 चेंडूत 22 धावा केल्या, तर अब्दुल समदने 14 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 29 धावांचे योगदान दिले. इंपैक्ट प्लेयर म्हणून आलेला वॉशिंगटन सुंदर आपले खातेही उघडून नाही शकला. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर उमरझाई, उमेश, रशीद खान आणि नूर यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

- Advertisement -

हैदराबदकडून मिळालेल्या धावांचा पाठलाग करताना गुजरातला 36 धावांवर पहिला धक्का बसला. ऋद्धिमान साहा 13 चेंडूंत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 25 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि इंपैक्ट प्लेयर साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 38 धावांची भागिदारी केली. मात्र शुबमन गिल 28 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावांची खेळी करून बाद झाला.

हेही वाचा – INDIA Mega Rally : तुमचा अरविंद शेर आहे, त्यांनी राजीनामा द्यावा का? सुनीता केजरीवालांचा जनतेला सवाल

चौथ्या क्रमांकावर आलेल्या डेव्हिड मिलरने साई सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागिदारी केली आणि संघाला विजयाजवळ नेले. इंपैक्ट प्लेयर साई सुदर्शनने 36 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकारासह सर्वाधिक 45 धावा केल्या. तर डेव्हिड मिलरने 27 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली. यासह गुजरातने 5 चेंडू शिल्लक राखत तीन सामन्यांतील दुसरा विजय मिळवला. तर सनरायझर्स हैदराबादचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -