Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा श्रीलंकेचा प्रमुख अष्टपैलू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार 

श्रीलंकेचा प्रमुख अष्टपैलू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त; फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार 

त्याने सहा कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले.

Related Story

- Advertisement -

श्रीलंकेचा अष्टपैलू आणि माजी कर्णधार थिसारा परेराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने याबाबतचे पत्र श्रीलंका क्रिकेटला (SLC) पाठवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ असून त्यामुळे युवा खेळाडूंना संधी मिळू शकेल, असे परेरा त्याच्या पत्रात म्हणाला. ३२ वर्षीय परेराने सहा कसोटी, १६६ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामन्यांत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्याने श्रीलंकेचे कर्णधारपदही भूषवले होते. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असली तरी तो फ्रेंचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.

सात वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व

मी सात वर्ल्डकप स्पर्धांमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करू शकलो हे माझे भाग्य होते. तसेच मी बांगलादेशमध्ये झालेल्या २०१४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धा जिंकणाऱ्या श्रीलंकन संघाचा भाग होतो आणि भारताविरुद्ध अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या विजयात योगदान दिल्याचा अभिमान आहे. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता, असे परेरा त्याच्या पत्रात म्हणाला.

सर्वोत्तम विजयांचा भाग

- Advertisement -

श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही परेराचे आभार मानले. परेरा उत्कृष्ट अष्टपैलू असून त्याचे श्रीलंकन क्रिकेटला मोठे योगदान आहे. श्रीलंकन क्रिकेटच्या काही सर्वोत्तम विजयांचा तो भाग होता. त्याच्या या योगदानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो आणि त्याला शुभेच्छा देतो, असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारीअ‍ॅश्ली डी सिल्वा म्हणाले.

- Advertisement -