घरक्रीडाT20 World Cup: चारिथा- राजपक्षाची सर्वोत्कृष्ट खेळी, श्रीलंकेचा ५ विकेट्सनं विजय

T20 World Cup: चारिथा- राजपक्षाची सर्वोत्कृष्ट खेळी, श्रीलंकेचा ५ विकेट्सनं विजय

Subscribe

श्रीलंकाने रविवारी आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यामध्ये बांग्लादेशचा पाच गडी राखून पराभव केला आहे. बांग्लादेशने पहिलीच फलंदाजी करताना मोहम्मद नईमच्या ६२ धावा आणि मुश्फिकुर रहीमच्या नाबाद ५७ धावांनी २० षटकांमध्ये चार गडी गामावून १७१ धावांचे आव्हान श्रीलंकेला दिले होते. श्रीलंकेच्या फलंदाजांनी सर्वोत्कृष्ट खेळी करत बांग्लादेशचे आव्हान केवळ १८.५ षटकांमध्ये ५ गडी गामावून संपुष्टात आणलं आहे. श्रीलंकेकडून चरिथा असालंकाने ८० धावा तर भानुका राजपक्षाने ५३ धावांची शानदार खेळी केली आहे.

श्रीलंका संघाला फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात करता आली नाही. कुशल परेरा एक धाव घेतल्यानंतर पहिल्या षटकात नासुम अहमदच्या चौथ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर पाथुम निसांका २४ धावा आणि चारिथा असालंकाच्या खेळीने संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवले. बांग्लादेशचा अनुभवी गोलंदाज शाकिब अल हसन याने निसांका आणि असालंकाच्या जोडीला तोडण्यात यश मिळवले. नवव्या षटकामध्ये निसांका बाद झाला असून त्याच षटकामध्ये अविश्का फर्नांडा आपलं खाते न उघडता तंबूत परतला. तर वानिंदू सहा धावांच्या पुढे जाण्यात अपयशी ठरला.

- Advertisement -

एकापाठोपाठ गडी बाद होत असताना श्रीलंकेच्या संघात चिंता पसरली होती. चारिथा एकाकी पडत असताना भानुका राजापक्षाने चांगली सोबत दिली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणण्यास मदत झाली. चारिथाने ४९ चेंडूत ५ चौके आणि पांच षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले. तसेच राजपक्षाने ३१ चेंडूच्या खेळीमध्ये ३ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. दोन्ही खेळाडूंच्या जोडीने ८६ रनांचा डोंगर उभा केला. १९ व्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर भानुका बाद झाला आणि कर्णधार दासुन शानाका एक धाव काढत नाबाद राहिला.

अशी होती बांग्लादेशची खेळी

लिटन दास आणि नईम या दोन खेळाडूंनी बांग्लादेशची सुरुवात उत्तम धावांनी केली होती. दोघांनी पहिल्या विकेटपुर्वी ४० धावा केल्या. दास लाहिरु कुमारा १६ रन केल्यानंतर तंबूत परतला. शाकिब १० धावामध्ये बाद झाला यानंतर नईमला रहीमची चांगली सोबत मिळाली. दोघांनी संघासाठी ७३ धावांची भागिदारी केली. या दोघांच्या खेळीमुळे बांग्लादेश मोठ्या अंकाचे आव्हान देऊ शकला. नईम १७ व्या षटकारमध्ये पहिल्याच चेंडूत माघारी परतला. त्याने आपल्या खेळीमध्ये ५२ चेंडू फटकावले असून त्यामध्ये ६ चौके मारले आहेत. अफिक हुसैनने ७ धावा केल्या आहेत. रहीम नाबाद राहिला असून त्याने संघासाठी चांगल्या धावा काढल्या आहेत. तसेच रहीमसोबत कर्णधार महामुदुल्ला १० धावांवर नाबाद राहिला आहे. श्रीलंकेकडून चामिका करुणारत्ने, बिनुरु फर्नांडो आणि कुमाराने एक-एक विकेट घेतला.

- Advertisement -

हेही वाचा :  T20 WC pak vs ind : पाकिस्तानी तरूणीची धोनीकडे अजब मागणी….


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -