Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचं भारतासमोर २१६ धावांचं आव्हान

IND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचं भारतासमोर २१६ धावांचं आव्हान

Subscribe

भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेचा दुसरा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सवर सुरू आहे. यावेळी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ३९.४ षट्कात २१५ धावा केल्या. तर २१६ धावांचं आव्हान हे श्रीलंकेने भारताला दिलं आहे. त्यामुळे भारतीय संघ आता श्रीलंकेला कसा प्रत्युत्तर देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नांडो सहाव्या षट्कात वैयक्तिक २० धावांवर बाद झाला. त्यानतंर कुशल मेंडिसने नुवानिंदु फर्नांडोसोबत अर्धशतकी भागिदारी करत डाव सावरला. श्रीलंकेचे दोन गडी बाद झाल्यानंतर १०२ वरून श्रीलंकेची अवस्था ७ बाद १५२ धावा अशी झाली होती. परंतु दुनिथ वेलालगे आणि कसुन रजिथा यांनी उत्कृष्ट फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेला २०० धावांचा टप्पा गाठता आला. त्यानंतर श्रीलंकेचा डाव २१५ धावांवरच आटोपला.

- Advertisement -

भारतीय संघाकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर उमरान मलिक आणि अक्षर पटेल यांनी अनुक्रमे २ व १ विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल केले आहेत. युझवेंद्र चहलच्या जागी संघात कुलदीप यादवची वर्णी लागली आहे. पहिला सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभव केला. त्यामुळे भारत मालिकेत १-० ने पुढे आहे. परंतु दुसऱ्या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याची संधी आता भारतीय संघाकडे आहे.

- Advertisement -

असे आहेत दोन्ही उभय संघ –

भारतीय संघ –

रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.

श्रीलंका संघ –

नुवानिंदु फर्नांडो, अविष्का फर्नांडो, कुशल मेंडिस , चरिथ असलंका, धनंजय डि सिल्वा, दसुन शनाका, वानिंदु हसरंगा, चमिका करुणारत्ने, कसुन रजिथा, दुनिथ वेलालगे, लाहिरू कुमारा.


हेही वाचा : मुंबई चॅम्पियनशिप टी-२० लीग : जे व्ही स्पोर्ट्स क्लबचा पराभव करत ऍग्रीबीड क्रिकेट क्लबचा विजय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -