BAN vs SL: श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू सामना सुरू असतानाच रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले…

पहिल्या सात षटकांमध्येच बांगलादेशची अवस्था 5 बाद 24 अशी झाली होती. शाकीब अल हसन, मोमीनुल हक, तमिम इकबाल यांसारख्या अनुभवी खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

श्रीलंका (sri lanka) विरुद्ध बांगलादेश (bangladesh) यांच्यातील कसोटी (test match) सामन्यादरम्यान श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिस (kusal mendis) याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने कुसल मेंडिसला सामना थांबवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुसलला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ सुरू 23 व्या षटकात अस्वस्थ वाटत असल्याने सामना थांवबून मैदानात बसला. स्वत:ची छाती (chest pain) पकडली आणि तो मैदानात खाली बसला. त्यानंतर त्याने आपल्या छातीत दुखूत (kusal mendis chest pain) असल्याचे संघाच्या वैद्यकीय टीमला सांगितले. त्यानंतर तातडीने वैद्यकीय टीमच्या मदतीने त्याला रूग्णालायात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेचा विकेटकिपर-फलंदाज कुसल मेंडिस याला ढाकाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुसल मेंडिस याला झालेला त्रास हा फारसा गंभीर नसावा अशी श्रीलंकन कॅम्पमधून आशा व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा –इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया घोषणा

पहिल्या कसोटी सामन्यात कुसल मेंडिस अप्रतिम फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकलं होतं. तसेच अँजेलो मॅथ्यूजच्या साथीने 98 धावांची महत्त्वाची भागीदारीही केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही कुसल मेंडिसने 43 चेंडूत 48 धावांची धुवाँधार खेळी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावरच श्रीलंकेने पहिली कसोटी अनिर्णित राखली होती. त्यानंतर आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाजांची तारांबळ उडाली.

हेही वाचा – भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा

पहिल्या सात षटकांमध्येच बांगलादेशची अवस्था 5 बाद 24 अशी झाली होती. शाकीब अल हसन, मोमीनुल हक, तमिम इकबाल यांसारख्या अनुभवी खेळाडूंना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. पण त्यानंतर मुश्फीकूर रहिम आणि लिटन दास दोघांनी अर्धशतके ठोकली आणि अप्रतिम भागीदारी करत दुपारच्या सत्रापर्यंत संघाला विकेट न गमावता 150 पार मजल मारून दिली.


हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T-20 मालिकेसाठी वसीम जाफरकडून टीम इंडियाची निवड, हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी