घरक्रीडाद. आफ्रिकेत श्रीलंकेचा झेंडा

द. आफ्रिकेत श्रीलंकेचा झेंडा

Subscribe

मालिका विजयासह ऐतिहासिक कामगिरी

पोर्ट एलिजाबेथ, श्रीलंका क्रिकेट संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पाहुण्या श्रीलंकेने 8 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली. आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे.तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करणारा श्रीलंका हा तिसरा संघ ठरला आहे. आफ्रिकेच्या 197 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने दोन विकेट्स गमावले. कुशल मेंडिस नाबाद 84 आणि ओशादा फर्नांडो 75 यांनी दमदार खेळी करत श्रीलंकेचा विजय निश्चित केला. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सपाटून मार खाणार्‍या श्रीलंकन संघाकडून आफ्रिका दौर्‍यात फार अपेक्षा केल्या जात नव्हत्या. दुसर्‍या कसोटीत आफ्रिकेच्या पहिल्या डावातील 222 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 154 धावांत गडगडला. पण, श्रीलंकेच्या गोलंदाजांनी दुसर्‍या डावात आफ्रिकेला कोंडीत पकडत आफ्रिकेचा दुसरा डाव 128 धावांवर गुंडाळला. 197 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेचे दोन फलंदाज 34 धावांवर माघारी परतले होते. पण, फर्नांडो व मेंडिस यांनी खिंड लढवताना संघाला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -