घरक्रीडाश्रीलंकेचा गोलंदाज टाकतो दोन्ही हातांनी बॉलिंग !

श्रीलंकेचा गोलंदाज टाकतो दोन्ही हातांनी बॉलिंग !

Subscribe

श्रीलंकेचा गोलंदाज कामिंडू मेंडिस हा दोन्ही हातानी गोलंदाजी करतो. त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्ड इलेव्हन संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध अभ्यास सामन्यात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली.

जागतिक क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज दोन्ही हातांनी गोलंदाजी करतोय हे दृश्य तुम्हाला रोज पाहायला मिळत नाही. पण श्रीलंकेचा एक गोलंदाज हा चमत्कार करू शकतो. श्रीलंकेचा युवा गोलंदाज कामिंडू मेंडिस हा दोन्ही हातांनी बॉलिंग करण्यात सक्षम आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्ड इलेव्हन संघाकडून खेळताना इंग्लंडविरुद्ध अभ्यास सामन्यात दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. मात्र त्याला विकेट मिळवण्यात अपयश आले.

२०१६ अंडर १९ वर्ल्डकपमध्ये केलेली गोलंदाजी 

कामिंडू मेंडिसची २०१६ अंडर १९ वर्ल्डकपमध्ये जगाला पहिली ओळख झाली होती. या स्पर्धेतही त्याने दोन्ही हातांनी गोलंदाजी केली होती. तो त्याच्या गोलंदाजीविषयी म्हणाला, “८ वर्षाचा असल्यापासून मी मित्रांसोबत गार्डनमध्ये क्रिकेट खेळायचो. तिथेच मी दोन्ही हातानी गलंदाजी करायला शिकलो. त्यामुळे आता मी कोणत्याही सामन्यात अगदी आरामात दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो.”

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -