घरक्रीडाआधी सामने जिंका, मग तक्रारी करा! माजी कर्णधाराने श्रीलंकन खेळाडूंना सुनावले

आधी सामने जिंका, मग तक्रारी करा! माजी कर्णधाराने श्रीलंकन खेळाडूंना सुनावले

Subscribe

खेळाडूंनी नव्या वेतनश्रेणीला विरोध दर्शवणे योग्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

श्रीलंकेच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंनी आपल्या क्रिकेट बोर्डाविरुद्ध बंड पुकारले आहे. श्रीलंकन बोर्डाने खेळाडूंसाठी नवी वेतनश्रेणी तयार केली आहे. परंतु, यात पारदर्शकता नसल्याचे म्हणत श्रीलंकन खेळाडूंनी काही दिवसांपूर्वी आपल्याच बोर्डाला निवृत्त होण्याची धमकी दिली होती. ही गोष्ट श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज अरविंदा डी सिल्वाला फारशी आवडलेली नाही. श्रीलंकेच्या खेळाडूंना तक्रारी करण्यापेक्षा सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे डी सिल्वा म्हणाला. डी सिल्वा अध्यक्षीय समितीनेच श्रीलंकन खेळाडूंसाठी नवी वेतनश्रेणी तयार केली आहे. खेळाडूंनी नव्या वेतनश्रेणीला विरोध दर्शवणे योग्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

अधिक सोयीसुविधा उपलब्ध करू

आमच्या खेळाडूंनी नव्या वेतनश्रेणीला विरोध दर्शवणे योग्य नाही. त्यांनी तक्रारी करण्यापेक्षा मैदानात सकारात्मक क्रिकेट खेळून देशासाठी सामने जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली, चांगली कामगिरी केली तर आम्हीसुद्धा त्यांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे डी सिल्वा एका मुलाखतीत म्हणाला.

- Advertisement -

इतर देशांच्या तुलनेत कमी वेतन

श्रीलंका क्रिकेटने मागील आठवड्यात २४ आघाडीच्या खेळाडूंना वार्षिक करार देऊ केले होते आणि ते स्वीकारण्यासाठी त्यांना ३ जून ही अंतिम तारीख देण्यात आली होती. केवळ सहा खेळाडूंचा अ श्रेणीमध्ये समावेश असून त्यांना ७० हजार ते एक लाख अमेरिकन डॉलर इतके वार्षिक वेतन मिळणार आहे. परंतु, इतर देशांच्या तुलनेत आम्हाला कमी वेतन मिळत असल्याचे म्हणत कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ करुणरत्ने, तसेच अँजेलो मॅथ्यूज यांनी करार स्वीकारण्यास नकार दिला होता.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -