जेव्हा किंग खान देतो मेस्सीबद्दलच्या ट्विटला रिप्लाय

srk rply to tweet about messi
लिओनेल मेस्सी आणि शाहरुख खान

अभिनेता शाहरुख खान नेहमीच आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहे. कोणीही विचारलेल्या प्रश्नाला पटकन उत्तर देण्यासाठी शाहरुख नेहमीच तयार असतो. असाच एक किस्सा सध्या ट्विटरवर ट्रेंड होतोय. शाहरुख खानने आपल्या एका फॅनला केलेला रिप्लाय ट्विटरवर व्हायरल होताना दिसतो आहे. जेव्हा चाहत्याने शाहरुखला लिओनेल मेस्सीसाठी प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा त्याने जो रिप्लाय दिला तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

नक्की काय मागणी केली फॅनने?

फुटबॉलचा विश्वचषक अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपलाय. जगभरातील फुटबॉल प्रेमींचा उत्साह अक्षरश: शिगेला पोहचलाय. अशाच एका मेस्सी फॅनने थेट शाहरुखलाच लिओनेल मेस्सी आणि त्याचा संघ अर्जेन्टिनासाठी प्रार्थना करायला सांगितली.

srks fans tweet
शाहरुखला फॅनने विचारलेल्या प्रश्नाचे ट्विट

शाहरुखने दिला भारी रिप्लाय

शाहरुख खानने त्याच्या फॅनने केलेल्या मागणीला रिप्लाय देताना लिहिले “मेस्सीला अजूनतरी शुभेच्छा द्यायची वेळ आलेली नाहीये, तो त्याच्या खेळाच्या जोरावर नक्की यश संपादन करेल” शाहरुखने दिलेला हा रिप्लाय चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सेलेब्रेटिजचा #ASK हा टॅग ट्विटरवर फेमस

ट्विटरवर सध्या अनेक सेलेब्रेटिज फॅन्ससोबत संवाद साधण्यासाठी #ASK अशाप्रकारचे टॅग आयोजित करतात. इतर अनेक सेलिब्रेटीप्रमाणे, बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने त्यांच्या चाहत्यांसाठी #AskSRK हा टॅग वापरलाय . ज्यात तुम्ही शाहरुख खानला टॅग करुन प्रश्न विचारु शकता.