घरक्रीडाराज्य खो-खो स्पर्धा : पुण्याला दुहेरी जेतेपदाची संधी

राज्य खो-खो स्पर्धा : पुण्याला दुहेरी जेतेपदाची संधी

Subscribe

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने सोलापूर येथे सुरु असलेल्या राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याला दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याची संधी आहे. पुण्याच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्यासमोर मुंबई उपनगरचे, तर महिलांच्या अंतिम सामन्यात पुण्यासमोर ठाण्याचे आव्हान असेल.

पुरुषांच्या उपांत्य फेरीतील चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुण्याने सांगलीवर २०-१८ अशी अवघ्या २ गुणांनी मात केली. या सामन्यात अक्षय गणपुलेने एक मिनिट तीस सेकंद आणि एक मिनिट चाळीस सेकंद संरक्षण करत पुण्याच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला सुयश गरगटे (१:३०, १:०० मिनिटे संरक्षण आणि चार बळी), सागर लेंगरे (१:३०, १:३० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी) यांची उत्तम साथ लाभली. सांगलीकडून सूरज लांडेने (१:४०, १:०० मिनिटे संरक्षण आणि पाच बळी) चांगली झुंज दिली.

- Advertisement -

पुरुषांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत मुंबई उपनगरने ठाण्याचा २१-२० असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. मुंबई उपनगरकडून नितेश रुके (१:३०, १:१० मिनिटे संरक्षण), ऋषिकेश मूर्चावडे (१:२०, १:४० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी), दुर्वेश साळुंखे (१:०० मिनिट संरक्षण आणि सहा बळी), निहार दुबळे (तीन बळी) यांनी अप्रतिम खेळ केला.
दुसरीकडे महिलांमध्ये पुण्याने रत्नागिरीचा ९-७ असा एक डाव आणि दोन गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुण्याच्या विजयात स्नेहल जाधव (२:००, २:०० मिनिटे संरक्षण आणि ३ बळी), भाग्यश्री जाधव (१:२०, २:०० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), कोमल दारवटकर (२:१० मिनिटे संरक्षण), काजल भोर (२:२० मिनिटे संरक्षण आणि एक बळी) या खेळाडू चमकल्या.

महिलांच्या दुसर्‍या उपांत्य फेरीत ठाण्याने उस्मानाबादला १०-९ असे पराभूत केले. रेश्मा राठोड (३:००, २:१० मिनिटे संरक्षण आणि तीन बळी), रूपाली बडे (२:५० मिनिटे संरक्षण), तेजश्री कोंडाळकर (२:००, १:४० मिनिटे संरक्षण आणि एक बळी), अश्विनी मोरे (२:२० मिनिटे संरक्षण) यांनी ठाण्याकडून चांगला खेळ केला. उस्मानाबादच्या निकिता पवारने झुंज दिली, पण तिला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -