घरक्रीडामुलांमध्ये कोल्हापूर, मुलींमध्ये पुण्याला जेतेपद

मुलांमध्ये कोल्हापूर, मुलींमध्ये पुण्याला जेतेपद

Subscribe

राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांसाठी (१७ वर्षांखालील) आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये कोलापूरच्या संघाने, तर मुलींमध्ये पुण्याच्या संघाने जेतेपद पटकावले. यावर्षी या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी वर्सोवा येथील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूलमध्ये पार पडली.

मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघाने मुंबईवर मात केली. मुलींच्या गटात पुण्याने अमरावतीचा पराभव केला. त्यामुळे या दोन्ही संघांनी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेच्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. हे अंतिम सामने प्रो-कबड्डी खेळाडू प्रशांत दाभाडे, शिवसेना नेते अमोल कीर्तिकर, मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बाराटक्के आणि चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर शाळेचे विश्वस्त अजय कौल यांच्या उपस्थितीत झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -