घरक्रीडाआकांक्षा कदम, विकास धारिया विजयी

आकांक्षा कदम, विकास धारिया विजयी

Subscribe

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील महिला गटाच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या निलम घोडकेवर मात करत ही स्पर्धा जिंकली. पुरुषांमध्ये विकास धारियाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

महिला गटातील अंतिम सामन्याच्या सुरुवातीला आकांक्षाला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तिने पहिला सेट १२-१५ असा गमावला. मात्र, तिने दमदार पुनरागमन केले. तिने दुसरा सेट २५-२१ असा, तर दुसरा सेट २२-१३ असा जिंकत या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्याच संदीप दिवेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २५-१२, ७-२४, २५-२० अशी मात केली. विकासाचे हे दुसरे राज्यस्तरीय जेतेपद ठरले आहे.

- Advertisement -

अंतिम फेरी गाठण्यापूर्वी आकांक्षाने पुण्याच्या पुष्कर्णी भट्टडवर ६-१९, २५-१६, १७-१६ असा विजय मिळवला होता. दुसरीकडे मुंबईच्या निलम घोडकेने मुंबईच्याच मिताली पिंपळेला २१-३, २५-१० असे नमवले होते. पुरुष गटात अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी संदीपने पुण्याच्या अभिजीतला २३-६, २०-१७ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले होते. मुंबईच्या विकासने पुण्याच्या रहीम खानचा २५-११, २५-४ असा पराभव केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -