Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Australian Open : नदालला पराभवाचा धक्का; विक्रमी २१ व्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे 

Australian Open : नदालला पराभवाचा धक्का; विक्रमी २१ व्या जेतेपदाचे स्वप्न अधुरे 

नदालला ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासने पराभूत केले.

Related Story

- Advertisement -

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदालचे २१ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नदालला ग्रीसच्या स्टेफानोस त्सीत्सीपासने ३-६, २-६, ७-६, ६-४, ७-५ असे पराभूत केले. नदालने यंदाच्या स्पर्धेत या सामन्यापूर्वी एकही सेट गमावला नव्हता. उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्याचीही नदालने दमदार सुरुवात केली होती. त्याला पहिले दोन सेट ६-३, ६-२ असे जिंकण्यात यश आले होते. यानंतर त्याचा खेळ काहीसा खालावला. त्सीत्सीपासने मात्र आपला सर्वोत्तम खेळ करत पुढील तिन्ही सेट जिंकत हा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

त्सीत्सीपासने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला

- Advertisement -

‘त्सीत्सीपासचे अभिनंदन. मोक्याच्या क्षणी त्याने माझ्यापेक्षा चांगला खेळ केला आणि म्हणूनच त्याला हा सामना जिंकण्यात यश आले. मी त्याला झुंज दिली. परंतु, ती सामना जिंकण्यासाठी पुरेशी नव्हती,’ असे सामन्यानंतर नदाल म्हणाला. आता उपांत्य फेरीत त्सीत्सीपासचा सामना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हशी होईल. मेदवेदेव्हने उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्याच आंद्रे रूब्लेव्हला ७-५, ६-३, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.


- Advertisement -

हेही वाचा – IPL 2021 Auction : जाणून घ्या आयपीएल लिलावाबाबत सर्व काही!  


 

- Advertisement -