घरक्रीडाकसोटीत कोहलीपेक्षा स्मिथ भारी - लबूशेन

कसोटीत कोहलीपेक्षा स्मिथ भारी – लबूशेन

Subscribe

कसोटीत मला एका फलंदाजाला निवडायचे असल्यास मी स्मिथचे नाव घेईन, असे लबूशेन म्हणाला.

भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जातात. या दोघांमध्ये सतत तुलना होत असते. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये एका फलंदाजाची निवड करायची झाली, तर मी स्मिथला निवडेन, असे मत ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लबूशेनने व्यक्त केले. कसोटी क्रमवारीत कोहली आणि स्मिथ बरीच वर्षे पहिल्या स्थानासाठी झुंजत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत धावा करण्याची स्मिथमध्ये क्षमता आहे आणि हीच गोष्ट त्याला इतरांपासून वेगळा बनवते, असे लबूशेनला वाटते.

कोणत्याही परिस्थितीत धावा करू शकतो

कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने सातत्याने दाखवले आहे की, तो कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही खेळपट्टीवर धावा करू शकतो. त्यामुळे स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज आहे. तो ऑस्ट्रेलियात सातत्यपूर्ण कामगिरी करतो आणि तितक्याच सातत्याने त्याने भारत, इंग्लंडमध्ये धावा केल्या आहेत. कुठे सामना होत आहे याने त्याला फरक पडत नाही, तो धावा करण्यासाठी मार्ग शोधून काढतो. कोहलीसुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करू शकतो. मात्र, कसोटीत मला एका फलंदाजाला निवडायचे असल्यास मी स्मिथचे नाव घेईन, असे लबूशेन म्हणाला.

- Advertisement -

कोहलीची कामगिरीही उत्कृष्ट 

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो एकदा खेळपट्टीवर टिकला, की सामना संपवून, आपल्या संघाला सामना जिंकवूनच पॅव्हेलियनमध्ये परततो. धावांचा पाठलाग करताना त्याच्यासारखी कामगिरी क्वचितच कोणाला करता आली आहे. त्याचा खेळ पाहून मला खूप शिकायला मिळाले आहे, असेही लबूशेनने नमूद केले. कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत ५० हून अधिकच्या सरासरीने धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -