Homeक्रीडाIND vs AUS Test : स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी; पण रोहित शर्मा...

IND vs AUS Test : स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी; पण रोहित शर्मा संघाबाहेर राहणार?

Subscribe

नवी दिल्ली : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीसाठी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरस आहे. खरे तर पाचव्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. असे असताना ऑस्ट्रेलियाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीलंका दौर्‍यासाठी ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स ऐवजी स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याची तयारी केली आहे. प्रसिद्ध सँडपेपर घटनेपूर्वी स्मिथने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे. (Steve smith selected as captain but rohit will out in sydney test)

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्मा कसोटीतून निवृत्त झाल्यास…; रवी शास्त्रींचे सूचक वक्तव्य 

पॅट कमिन्सला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेनंतर आराम देण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जायचे आहे. या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सच्या खांद्यावर असणार आहे. यासाठी श्रीलंका दौर्‍यात पॅट कमिन्सला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत पॅट कमिन्सने सांगितले आहे की, ‘तुम्ही तुमच्या जबाबदार्‍यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. मी मागच्या काही दिवसात बरेच काही गमावले आहे. पण यावेळेस मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छितो.’ दुसरीकडे, निवडकर्त्याने पॅट कमिन्सच्या निर्णयाचा आदर राखत स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पण रोहित शर्मा बाहेर राहणार?

खराब फॉर्ममुळे फलंदाजीत सातत्याने अपयशी ठरत असलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या सिडनी कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा फलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर अपयशी ठरत होता. सोबत कर्णधार म्हणूनही त्याला ऑस्ट्रेलियात एकही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे रोहित शर्मावर दडपण वाढत चालले होते. त्याच्या निवृत्तीची चर्चा व्हायला लागली होती. मेलबर्नमधील पराभवानंतर गौतम गंभीर वरिष्ठ खेळाडूंवर भडकल्याचे वृत्त पसरले होते, परंतु गुरुवारच्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने याचे खंडन केले.

प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील ड्रेसिंग रूममधील चर्चा एवढ्यापुरतीच मर्यादित असावी. जोपर्यंत ड्रेसिंग रूममध्ये प्रामाणिक लोक आहेत तोपर्यंत भारतीय क्रिकेट सुरक्षित हातात आहे. फक्त एकच गोष्ट तुम्हाला संघात ठेवू शकते आणि ती म्हणजे कामगिरी, असे गौतम गंभीरने स्पष्ट केले होते. रोहितने घेतलेल्या विश्रांतीच्या निर्णयामुळे अंतिम संघामध्ये शुभमन गिलचा समावेश होण्याची शक्यता आहे, तर संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे असणार आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सध्या भारत 2-1ने पिछाडीवर आहे. भारतासाठी करो अथवा मरो अशी अवस्था झाली आहे. पाचवी कसोटी जिंकल्यास भारताला ही कसोटी मालिका ड्रॉ तरी करता येईल अथवा सलग दुसर्‍या कसोटी मालिकेच्या पराभवाला सामोरे जावे लागेल.