घरक्रीडासंयम शमला,स्टेनगन थंडावली

संयम शमला,स्टेनगन थंडावली

Subscribe

मागील काही दिवसांत स्टेनने कसोटी क्रिकेटमधून, तर आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मागील काही काळात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. आता दोन महान खेळाडू निवृत्त झाल्याने यापुढील काळात दक्षिण आफ्रिकन संघाला यशस्वी होण्यासाठी इतर खेळाडूंनी त्यांच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. मात्र, या दोन मौल्यवान हिर्‍यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागणार, हे निश्चित.

मागील काही दिवसांत स्टेनने कसोटी क्रिकेटमधून, तर आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मागील काही काळात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. आता दोन महान खेळाडू निवृत्त झाल्याने यापुढील काळात दक्षिण आफ्रिकन संघाला यशस्वी होण्यासाठी इतर खेळाडूंनी त्यांच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. मात्र, या दोन मौल्यवान हिर्‍यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागणार, हे निश्चित.

जागतिक क्रिकेटमध्ये किंवा खेळांमध्येच फार कमी असे खेळाडू असतात, ज्यांच्यावर इतर देशांमधील चाहतेही खूप प्रेम करतात. आपल्या संघाविरुद्ध हे खेळाडू खेळत असताना आपला संघ जिंकावा, पण त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी अशी या चाहत्यांची इच्छा असते. असेच दोन खेळाडू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे हाशिम आमला आणि डेल स्टेन. मागील काही दिवसांत स्टेनने कसोटी क्रिकेटमधून, तर आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मागील काही काळात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. आता दोन महान खेळाडू निवृत्त झाल्याने यापुढील काळात दक्षिण आफ्रिकन संघाला यशस्वी होण्यासाठी इतर खेळाडूंनी त्यांच्या खेळात सुधारणा करणे गरजेचे झाले आहे. मात्र, या दोन मौल्यवान हिर्‍यांची पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागणार, हे निश्चित.

- Advertisement -

हाशिम मोहम्मद आमला या भारतीय वंशाच्या दाढीदारी फलंदाजाने २००४ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने आमलाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेवर, तसेच चेंडू खेळण्याआधी ‘बॅक अँड अक्रॉस’ जाण्याच्या तंत्रावर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, २००६ साली न्यूझीलंडविरुद्ध आपल्या चौथ्या कसोटीत आणि पदार्पण केल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी त्याने आपले पहिले शतक झळकावले. या सामन्यात खर्‍या अर्थाने जगाला ‘संयमी’ आमलाची ओळख झाली. त्याने जवळपास ७ तास किल्ला लढवत ३१७ चेंडूत १४९ धावांची खेळी केली. परंतु, यानंतर पुढील शतकासाठी त्याला एका वर्षाची वाट पाहावी लागली. त्याने त्याच्या लाडक्या न्यूझीलंडविरुद्धच (ज्यांच्याविरुद्ध त्याने ६१ च्या सरासरीने धावा केल्या) साडेआठ तास खेळपट्टीवर ठाण मांडत नाबाद १७६ धावा केल्या. यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही.

२०१२ साली इंग्लंडविरुद्ध ओव्हलच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात त्याने १३ तासाहूनही अधिक काळ फलंदाजी करत नाबाद ३११ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो दक्षिण आफ्रिकेचा पहिला आणि एकमेव फलंदाज! त्याच्या या खेळीत एकाही षटकाराचा समावेश नव्हता. टी-२० क्रिकेटच्या जमान्यात ही गोष्ट फारच उल्लेखनीय आहे. याच संयमामुळे, फलंदाजीतील नजाकतीमुळे, मनगटाच्या उत्कृष्ट वापरामुळे, कोणत्याही परिस्थितीत खेळपट्टीवर टिकून राहण्याच्या तयारीमुळे आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे आमला युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान बनला. दरम्यान, संथ फलंदाजीसाठी टीकाही झेलणार्‍या आमलाने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही अफलातून कामगिरी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार ते ७ हजार धावा, दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक शतके (२७) त्याच्याच नावे आहेत. मात्र, मागील एक-दोन वर्षांत पूर्वीचा आमला पाहायला मिळालेला नाही. त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने निराशाजनक प्रदर्शन केले. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. परंतु, कितीही टीका झाली, तरी संयम सोडेल तो आमला कसला. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५ शतके लगवणार्‍या फलंदाज आमलासोबतच उत्कृष्ट माणूस असलेल्या आमलाची दक्षिण आफ्रिकेला कमी जाणवेल.

- Advertisement -

दुसरीकडे ‘स्टेन’गन म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या वेगाने, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करण्याच्या आणि कोणत्याही खेळपट्टीवर विकेट मिळवण्याच्या क्षमतेमुळे फलंदाजांची झोप उडवणार्‍या स्टेनला मागील काही काळात दुखापतींनी सतावले आहे. त्यामुळे त्याने आता केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. २००३ साली प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार्‍या स्टेनला कसोटी संघात एंट्री मिळवण्यासाठी केवळ एक वर्ष लागले. सातत्याने १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करण्यात सक्षम असणार्‍या स्टेनला सुरुवातीच्या काही सामन्यांत यश मिळाले नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यातही आले.

संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. कौंटीमध्ये दमदार कामगिरी केल्याने त्याच्यासाठी द.आफ्रिकन संघाची दारे पुन्हा उघडली. जवळपास १३ महिन्यांनंतर पुनरागमन करणार्‍या स्टेनने न्यूझीलंडविरुद्धच्या ३ कसोटी सामन्यांत १६ विकेट मिळवत संघात आपले स्थान पक्के केले. यानंतर २००७ साली न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांत २० बळी घेतल्यामुळे तो खर्‍या अर्थाने प्रकाशझोतात आला. घरच्या मैदानावर असो, भारत असो, इंग्लंड असो वा अजून कुठे; स्टेन जिथे खेळला, तिथे त्याने यश मिळवले. मागील वर्षीच शॉन पोलॉकला मागे टाकत तो दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण ९३ सामन्यांत ४३९ गडी बाद केले, ज्यात तब्बल २६ वेळा एका डावात ५ विकेट, तर ५ वेळा एका सामन्यात १० विकेटचा समावेश आहे. ही कामगिरी करणारा गोलंदाज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो, याचे नवल नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -