घरक्रीडास्टुअर्ट ब्रॉडची विक्रमाला गवसणी, ५०० बळी घेणारा ठरला सातवा गोलंदाज

स्टुअर्ट ब्रॉडची विक्रमाला गवसणी, ५०० बळी घेणारा ठरला सातवा गोलंदाज

Subscribe

इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने विक्रमाला गवसणी घातली आहे. स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा सातवा गोलंदाज ठरला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत ब्रॉडने हा पल्ला गाठला आहे. क्रेग ब्रेथवेट ब्रॉडचा ७०० वा बळी ठरला.

स्टुअर्ट ब्रॉडच्या आधी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५०० बळींचा टप्पा पार केला आहे. २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी लढतीत त्याने ही कामगिरी नोंदवली होती. जेम्स अँडरसनचा ५०० वा बळीही क्रेग ब्रेथवेट हाच ठरला होता. आता ३४ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडनेही विंडीजविरुद्धच्या कसोटीत हा कारनामा केला. अखेरच्या कसोटीत क्रेग ब्रेथवेट याचा बळी मिळताच त्याची ‘500 क्लब’मध्ये एन्ट्री झाली आहे.

- Advertisement -

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

१. मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) – ८०० बळी
२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – ७०८ बळी
३. अनिल कुंबळे (भारत) – ६१९ बळी
४. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – ५८९ बळी
५. ग्लेन मेकग्राथ (ऑस्ट्रेलिया) – ५६३ बळी
६. कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज) – ५१९ बळी
७. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड) – ५०० बळी*

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -