घरक्रीडाकानपूरमध्ये क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कानपूरमध्ये क्रिकेट खेळताना विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात मैदानावर क्रिकेट खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादयक घटना घडली आहे. अनुज पांडे (16) असे मृत खेळाडूचे नाव आहे.

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात मैदानावर क्रिकेट खेळत असताना विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादयक घटना घडली आहे. अनुज पांडे (16) असे मृत खेळाडूचे नाव आहे. कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर येथे असलेल्या बीआयसी मैदानावर क्रिकेट खेळतेवेळी फलंदाजी करत असताना अनुजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. (Student Fall And Died While Playing Cricket In Bilhaur Kampur)

नेमकी घटना काय?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्यात क्रिकेट मॅचमध्ये फलंदाजी करत असताना अनुज पांडे या 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अनुज धावा काढण्यासाठी धावत असताना अचानक खाली पडला. सुरवातील उपस्थित खेळाडूंना तो खाली कशाने पडला हे समजले नाही. मात्र त्याला रुग्णलयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने अनुजचा मृत्यू झाला. अनुजच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अनुजला याआधी कोणताही आजार नसल्याचे सांगितले.

अनुज हा दहावीचा विद्यार्थी होता. शुक्रवारी अनुज क्रिकेट खेळण्यासाठी मित्रांसोबत बीआयसी मैदानात गेला होता. अनुज फलंदाजी करत होता. फलंदाजी करत असताना तो धावा काढण्यासाठी धावला, मात्र त्यावेळी तो मधीच पीचवर पडला. त्यावेळी त्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. अनुजच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूनंतर वडील अमित पांडे यांनी सांगितले, की “मला सुमित आणि अनुज ही दोन मुले. त्यातला अनुज हा मित्रांसोबत बीआयसी मैदानावर क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेला होता. अनुज रन काढण्यासाठी धावला, तेव्हा तो अचानक कोसळला. मैदानात उपस्थितानी सांगितले की अनुज पीचवर कोसळल्यानंतर इतर खेळाडूंनी त्याचे हात-पाय चोळले. पण अनुजने कोणतीही हालचाल करत नसल्याने आम्हाला त्यांनी बोलवले. त्यानंतर आम्ही अनुजला जवळच्या रुग्णालयात नेले. त्यावेळी तिथल्या डॉक्टरांनी त्याला सीएचसी बिल्हौर या रुग्णालयात नेण्यास सांगितलं. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं”

- Advertisement -

दरम्यान, मैदानावर खेळत असताना मृत्यू झाल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मेरठमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. या ठिकाणी एका 25 वर्षीय तरुणाचा शिंक आल्यानंतर अचानक मृत्यू झाला. चार तरुण एकत्र असताना त्यापैकी एका मुलाला शिंक आली व त्यानंतर तो अचानक खाली पडला. इतरांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


हेही वाचा – राज्यपालांविरोधातील आंदोलनात शिवप्रेमींना एकत्र येण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन, उदयनराजे म्हणतात…

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -