घरक्रीडासब ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

सब ज्युनियर राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

Subscribe

वाराणसी येथे झालेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय आणि आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या १४ वर्षंखालील गटात महाराष्ट्राच्या आकांक्षा कदमने तामिळनाडूच्या आर. मोनिशाचा २१-०, १२-१० सहज असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तामिळनाडूच्या एम. खाजिमाने तामिळनाडूच्याच एस. अस्वीकावर ९-३, ११-२१, २१-४ असा विजय संपादन केला. १४ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एन. मिथुनने उत्तर प्रदेशच्या मोईनुद्दीनचा १५-१, १४-१० असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केले.

सांघिक गटात महाराष्ट्राच्या मुलांनी बाजी मारली. महाराष्ट्राने अंतिम फेरीत तामिळनाडूचा २-१ असा पराभव केला. तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत उत्तर प्रदेशचा संघ विजयी ठरला. त्यांनी पाँडिचेरीचा ३-० असा सहज पराभव केला. मुलींच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत मात्र तामिळनाडूच्या संघाने महाराष्ट्रावर २-१ अशी मात केली. याच गटाच्या तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीमध्ये बिहारने उत्तर प्रदेशला २-१ असे पराभूत केले.

- Advertisement -

१२ वर्षांखालील कॅडेट मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या एस. नवीनकुमारने महाराष्ट्राच्या नीलांश चिपळूणकरचा ५-२०, २०-१९, २०-१८ असा पराभव करत विजेतेपद मिळवले, तर कॅडेट मुलींच्या एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या व्ही. मिथराने महाराष्ट्राच्या मधुरा देवळेवर १६-१०, १४-१२ असा सरळ सेटमध्ये विजय संपादन केला आणि या गटाचे विजेतेपद मिळविले. विजेत्यांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -