सिया देवरूखकरची कांस्य कमाई

सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा

Siya

राजकोट येथे नुकतीच सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या सिया देवरुखकरने ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सियाने ४२.०४ अशी वेळ नोंदवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. अंतिम फेरी तिने ४२.३० सेकंदांत पूर्ण करत आपले पहिले राष्ट्रीय कांस्यपदक पटकावले.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आसामच्या पाही बोरा हिने ४२.०४ अशी वेळ नोंदवत सुवर्ण आणि दिल्लीच्या प्रकृती दहीयाने ४२.२८ अशी वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले. पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यमात इयत्ता पाचवीमध्ये शिकणार्‍या सियाला हे यश प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, सचिव मोहन राणे आणि प्रशिक्षक सहदेव नेवाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.