घरक्रीडासुदेश कुळे, पौर्णिमा जेधेकडे मुंबईचे नेतृत्व

सुदेश कुळे, पौर्णिमा जेधेकडे मुंबईचे नेतृत्व

Subscribe

सिनियर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुंबईच्या पुरुष संघाचे सुदेश कुळे तर पौर्णिमा जेधेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले.

सिनियर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा काहीच दिवसांत नाशिक येथे पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई शहर कबड्डी असोसिएशनने बुधवारी आपले पुरुष आणि महिला असे दोन्ही संघ जाहीर केले. या स्पर्धेत पुरुष संघाचे गुड मॉर्निंग क्लबचा सुदेश कुळे नेतृत्व करणार आहे. तर शिवशक्तीच्या पौर्णिमा जेधेकडे महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. महिलांच्या संघात शिवशक्तीच्या सात खेळाडूंची निवड झाली आहे.

स्पर्धेसाठी संघ खालीलप्रमाणे-

पुरुष संघ : सुदेश कुळे (संघनायक) (गुड मॉर्निग), जितेश सापते (बंड्या मारुती), संकेत सावंत (अमर – काळाचौकी), अजिंक्य कापरे (विजय क्लब), विजय दिवेकर (विजय क्लब), सुशांत साईल (अंकुर), धीरज उतेकर (गोलफादेवी), ओमकार जाधव (एच जी एस), पंकज मोहिते (एस एस जी फाऊंडेशन), ओमकार देशमुख (शिवशक्ती), सिद्धेश सावंत (जय भारत), मयूर खामकर (विजय नवनाथ).
महिला संघ : पौर्णिमा जेधे (संघनायिका), पूजा यादव, साक्षी रहाटे, ऋतुजा बांदिवडेकर, प्रतीक्षा तांडेल, प्रियंका कदम, तेजश्री चौगुले (वरील सातही खेळाडू शिवशक्तीचे), श्रुती शेडगे (महर्षी दयानंद), मेघा कदम, धनश्री पोटले (दोन्ही डॉ. शिरोडकर), श्रद्धा कदम, तेजश्री सारंग (दोन्ही अमरहिंद).
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -