घरक्रीडा'नाटू नाटू'ची सुनील गावसकरांना देखील भुरळ; डान्स करत केला आनंद साजरा

‘नाटू नाटू’ची सुनील गावसकरांना देखील भुरळ; डान्स करत केला आनंद साजरा

Subscribe

साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला नुकताच ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ हा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ही बातमी सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. ‘नाटू नाटू’ या गाण्याने 95 व्या ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडमधील अनेक चित्रपटातील गाण्यांना मागे टाकलं. दरम्यान, या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर भारतातील विविध क्षेत्रातील दिग्गजांची चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. नाटू नाटूच्या यशाचा उत्साह भारतीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळाला.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी या गाण्याची आयकॉनिक डान्स स्टेप केली. वयाच्या 73 व्या वर्षी देखील सुनील गावस्कर यांचा उत्साह पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कॉमेंट्री करणाऱ्या गावस्करांनी पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी नाटू-नाटू डान्स स्टेप करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते देखील अनेक मजेशीर कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, भारताने यंदा ऑस्करमध्ये‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या गाण्याव्यतिरिक्त ‘The Elephant Whisperers’ या शॉर्ट फिल्ममध्ये देखील ऑस्कर पटकावला आहे. त्यामुळे भारतीय कलाकारांसोबतच अनेक प्रेक्षक देखील टीमचे कौतुक करताना दिसत आहे.

 


हेही वाचा :

लाल साडीत सजली स्वरा, तेलुगू पद्धतीचा ब्रायडल लूक चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -