घरक्रीडाT20 world cup 2021: रोहितच्या बदललेल्या बॅटिंग ऑर्डरमुळे गावस्कर भडकले

T20 world cup 2021: रोहितच्या बदललेल्या बॅटिंग ऑर्डरमुळे गावस्कर भडकले

Subscribe

ट्रेंन्ट बोल्टच्या आक्रमक माऱ्याचा सामना करण्यासाठी रोहीत शर्मावर भारतीय संघाचा विश्वास नसल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले असल्याचा दावा गावस्करांनी केला आहे

रविवारी झालेल्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या सामन्यात रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. एरवी सलामीवीर म्हणून फलंदाजी करणारा रोहित रविवारच्या सामन्यात अचानक तिसऱ्या क्रमांकावर आल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी एक अजब दावा केला आहे. “ट्रेंन्ट बोल्टच्या आक्रमक माऱ्याचा सामना करण्यासाठी रोहीत शर्मावर भारतीय संघाचा विश्वास नसल्याने त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले असल्याचा दावा गावस्करांनी केला आहे. रोहितची गणना व्हाइट बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये एक महान खेळाडू म्हणून होऊ शकते, तर विराट कोहलीला चालू टी २० विश्वचषकात आलेले अपयश पाहता त्याने लहान फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करावे असे गावस्करांनी सांगितले.

रविवारच्या सामन्यात ईशान किशनला सलामीवीर म्हणून खेळवल्यामुळे रोहितला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागले. डावाच्या सुरूवातीला रोहीत फलंदाजी करताना असुरक्षित वाटत आहे असे संघाला पाकिस्तान विरूध्दच्या सामन्यात जाणवले. म्हणूनच रविवारच्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले पण ही चाल पूर्णपणे अयशस्वी ठरली. न्यूझीलंडच्या आक्रमक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी पूर्णत: शरणागती पत्करली. भारतीय संघाने पहिल्या डावात २० षटकांत ७ बाद केवळ ११० धावा उभारल्या. न्यूझीलंडने या तुरळक धावांच्या आव्हानाचा पाठलाग केवळ १४.३ षटकांत २ गडी गमावून पूर्ण केला.

- Advertisement -

“ईशान किशनची आक्रमक फलंदाज म्हणून ओळख आहे. ताबडतोड फलंदाजी करण्याची त्याच्यात क्षमता आहे, एक फलंदाज म्हणून त्याला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर खेळवणे सोयिस्कर झाले असते. पण रोहित शर्माला डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या ट्रेंन्ट बोल्टच्या घातक माऱ्याचा सामना करणे कठीण होईल, याबाबत भारतीय संघाने रोहितवर अविश्वास दाखविल्याचे देखील गावस्करांनी सांगितले. एखादा खेळाडू जर त्या जागेवर कित्येक वर्षापासून खेळत असेल आणि त्याच्या खेळीत अचानक असा बदल करणे त्या खेळाडूला काय संदेश देतो. आपल्यात पहिल्यासारखी क्षमता नसल्याचे साहजिकच तो विचार करेल. जर किशनने ७० धावांची खेळी केली असती तर त्याचे कौतुक देखील झाले असते पण पण त्याने खेळी नाही केली तर साहजिकच त्याला टिकेला सामोरे जावे लागेल. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

रोहितला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय चुकीचा

“मला माहित नाही की संघाला अपयशाची भीती आहे की नाही, परंतु मला माहित आहे की रविवारच्या सामन्यात त्यांनी फलंदाजीच्या क्रमवारीत जे काही बदल केले ते कामी आले नाहीत.रोहित शर्मा हा महान फलंदाज आहे आणि त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. तिसऱ्या क्रमांकावर रोहीत तर टी २० मध्ये इतक्या धावा करणारा कोहली स्वतःला चौथ्या क्रमांकावर उतरवतो. ईशान किशनसारख्या युवा खेळाडूला सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय अमान्य असल्याचे गावसकरांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – T20 world cup 2021 : भारत अजूनही गाठू शकतो उपांत्य फेरी; जाणून घ्या काय आहे समीकरण


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -