Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा IND vs ENG : मला फोन करून विचारा! 'या' गोष्टीबाबत बेअरस्टोचे गावस्करांना प्रत्युत्तर

IND vs ENG : मला फोन करून विचारा! ‘या’ गोष्टीबाबत बेअरस्टोचे गावस्करांना प्रत्युत्तर

बेअरस्टोने एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली असली तरी त्याने कसोटीत मात्र निराशा केली होती.

Related Story

- Advertisement -

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने दमदार कामगिरी केली आहे. त्याने या मालिकेच्या पहिल्या सामन्यात ९४ धावांची, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२४ धावांची खेळी केली. बेअरस्टोने एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी केली असली तरी त्याने कसोटीत मात्र निराशा केली होती. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत त्याला विश्रांती देण्यात आली होती. तिसऱ्या कसोटीत त्याचे इंग्लंड संघात पुनरागमन झाले. मात्र, या कसोटीच्या दोन्ही डावांत तो खातेही उघडू शकला नाही. तर चौथ्या कसोटीच्या एका डावात त्याने २८ धावा केल्या, पण दुसऱ्या डावात तो पुन्हा शून्यावर बाद झाला. त्यामुळे सुनील गावस्करांनी त्याच्यावर टीका केली होती. बेअरस्टोला कसोटीत खेळण्याची इच्छा दिसत नाही, असे गावस्कर म्हणाले होते. मात्र, ही गोष्ट बेअरस्टोला फारशी आवडलेली नाही.

मत कसे तयार केले?

मी कसोटी क्रिकेट खेळण्यास इच्छुक आहे की नाही, हे गावस्कर यांनी मला फोन करून विचारावे. गावस्कर माझ्याविषयी नक्की काय बोलले हे मला ठाऊक नाही. त्यांनी माझ्याशी कधीही संपर्क साधलेला नाही. चर्चा केलेली नाही. असे असतानाही त्यांनी माझ्याविषयी मत कसे तयार केले? असा प्रश्नही गावस्कर यांनी उपस्थित केला. गावस्कर मला फोन करू शकतात. मला कसोटीत खेळायची इच्छा आहे की नाही, हे मी त्यांना नक्कीच सांगेन, असेही बेअरस्टो म्हणाला.

गावस्कर काय म्हणाले होते?

- Advertisement -

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचे दोन्ही कसोटी सामने अहमदाबाद येथे झाले होते. त्या सामन्याच्या दुसऱ्या डावात बेअरस्टोला अश्विनने शून्यावर बाद केले होते. त्यानंतर समालोचन करत असलेले गावस्कर म्हणाले, तू अजून एकही धाव केलेली नाहीस आणि चेंडू अशाप्रकारे मारलास की आजूबाजूला कोणताही फिल्डर नाही. कसोटीत खेळण्याची इच्छा नसलेल्या फलंदाजाचा हा फटका होता.

 

- Advertisement -

 

- Advertisement -