टी-२० वर्ल्डकप निवडीमुळे सूर्या, इशांत फलंदाजीत सुस्तावले, सुनील गावस्करांनी सुनावले

मुंबई इंडियन्सचे फलंदाज सूर्यकुमार यादव आणि आशान किशन यांना आयपीलएच्या दुसऱ्या प्प्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही. इशानला मागील काही सामन्यांमध्ये वगळण्यात आले होते. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी काही दिवस आधी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आणि या संघात दोघांचाही समावेश करण्यात आला. भारतीय संघातील निवडीमुळेच या दोघांचा फलंदाजीत निवांतपणा आला असून हे चुकीचे फटके मारत असल्याचे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी व्यक्त केले.

मला वाटते सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन भारतीय संघाकडून खेळल्यानंतर त्यांच्या फलंदाजीत निवांतपणा आला आहे. शॉट सिलेक्शन योग्य ठेवणे फार महत्वाचे आहे, असे गावस्कर म्हणाले. आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक ईशान चालू मोसमातील आठ आयपीएल सामन्यांमध्ये फक्त १०७ धावा करू शकला आहे. तर सूर्यकुमारने १२ सामन्यात १८.५० च्या सरासरीने फक्त २२२ धावा केल्या आहेत. ५६ धावा त्याच्या सर्वोत्तम कामगिरी आहे.

दरम्यान, गावस्क्र यांनी ऑलराउंडर हार्दिक पांड्यावर देखील परखड मत व्यक्त केले. पांड्याला सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी करण्यात अपयश आल्यामुळे केवळ मुंबई इंडियन्सलाच नव्हे तर टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघालाही मोठा धक्का बसला आहे. भारतीय निवड समितीने हार्दिकला टी-२० विश्वचषक संघात स्थान दिले आहे. पण आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी करत नाही आहे. हार्दिकने दोन वर्षांपूर्वी यूकेमध्ये पाठीची शस्त्रक्रिया केली होती, त्यानंतर त्याने खूप कमी गोलंदाजी केली आहे.

गावस्कर म्हणाले, “हार्दिक पांड्या गोलंदाजी न करणे हा एक मोठा धक्का आहे, केवळ मुंबई इंडियन्ससाठीच नव्हे तर भारतासाठीही कारण त्याला अष्टपैलू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे.जर तुम्ही संघात असाल, सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करत असाल आणि तुम्ही गोलंदाजी करत नसाल तर कर्णधारासाठी गोष्टी कठीण होतात, असे गावस्कर म्हणाले.