सुनील गावस्करांना वाटतो टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू महत्त्वाचा

गावस्करांच्या म्हणण्यानुसार, वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या महत्त्वाचा आहे. तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये त्यानं ज्या तऱ्हेने बॉलिंग केली, त्यामुळं भारताला जिंकता आलं.

sunil gavskar

भारत आणि इंग्लंडमध्ये तीन वनडे मॅच सिरीज गुरुवारपासून ट्रेंटब्रिजमध्ये सुरु होत आहे. टी-२० मध्ये चांगलं प्रदर्शन केल्यानंतर वनडे सिरीजमध्येसुद्धा असचं जोरदार प्रदर्शन करण्याचा टीम इंडियाचा मानस असेल. मात्र इंग्लंडच्या टीमला कमी समजून चालणार नाही. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमला ५-० हरवून इंग्लंडनं क्रमवारीत पहिला क्रमांक गाठला आहे. पहिली मॅच आपल्या खिशात घालण्यासाठी दोन्ही संघात चुरस आहे. तर यासंदर्भात टीम इंडियाचे ‘लिटील मास्टर’ सुनील गावस्करांच्या दृष्टीनं वनडे मॅच जास्त चुरशीच्या होणार असून टीम इंडियातील एक खेळाडू त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो आहे. या खेळाडूचं नाव आहे हार्दिक पांड्या.

काय म्हणत आहेत सुनील गावस्कर?

गावस्करांच्या म्हणण्यानुसार, वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या महत्त्वाचा आहे. तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये त्यानं ज्या तऱ्हेने बॉलिंग केली, त्यामुळं भारताला जिंकता आलं. पहिल्या ओव्हरमध्ये २२ रन्स दिल्यानंतरही पुढील तीन ओव्हर्समध्ये ४ विकेट्स घेऊन इंग्लंडला झटका दिला होता. त्यामुळं बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही दृष्टीकोनातून हार्दिक पांड्या भारताकडून चांगलं खेळणारा खेळाडू असल्याचं गावस्कर यांना वाटत आहे.

बटलरचा जबरदस्त फॉर्म

नुकतचं इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. जोस बटलर सध्या जबरदस्त फॉर्ममधून असून त्याच्या एकट्याच्या जोरावर मॅच फिरू शकते. गावस्करांच्या मते, कुलदीप आणि चहलची निवड करायची की, स्पिनरचा वापर करायचा याचा भारताला विचार करावा लागेल. ऊन असल्यास, पिचवर स्पिनर्सच्या बॉल्सना ग्रिप मिळेल आणि टर्न होण्याची जास्त संधी असल्याचंही गावस्करांनी नमूद केलं आहे.

टीम इंडियापुढील आव्हान

गावस्करांच्या मते, शिखर धवन टी – २० मध्ये अजिबातच यश मिळवू शकला नाही. त्यामुळं वनडे मध्ये त्याची बॅट तळपण्याची शक्यता आहे. बुमराह खेळणार नसल्यामुळं टीम इंडियाची चिंता वाढली असून भुवनेश्वरदेखील खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.