‘वर्कलोड मॅनेजमेंट’वरून सुनील गावस्करांनी भारतीय खेळाडूंना फटकारले; म्हणाले…

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. अनेक तज्ज्ञही या पराभवावर आणि भारतीय संघाच्या खेळीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या पराभवानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी संघाच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर टीका केली आहे. (Sunil Gavaskar scolded team India players Where does your workload management go while playing the IPL)

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुनील गावस्कर यांनी वर्कलोड मॅनेजमेंटवरून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियावर टीकेचा बाण सोडला. तसेच भारतीय क्रिकेटला ‘वर्कलोड मॅनेजमेंट’च्या पलीकडे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय, आयपीएल खेळताना वर्कलोड मॅनेजमेंट कुठे जाते? असा सवालही गावस्कर यांनी उपस्थित केला.

“तुम्ही आयपीएल खेळता, त्याचा पूर्ण सीजन खेळता. तुम्ही त्यासाठी प्रवासही करता. यापूर्वीचा आयपीएल सीजन केवळ चार मैदानांवर झाला. परंतु बाकीसाठी तर तुम्हाला प्रवास करावाच लागतो. तेव्हा थकायला होत नाही? त्यावेळी वर्कलोड होत नाही? केवळ भारतासाठी खेळायचं असेल तरच वर्कलोड होतो. तोही तेव्हा जेव्हा तुम्ही नॉन ग्लॅमरस देशांच्या दौऱ्यावर जाता. तेव्हाच तुम्हाला वर्कलोड जाणवतो?” असे सवाल उपस्थित करत गावस्करांनी खेळाडूंना फटकारले.

तुम्ही तंदुरुस्त असाल तर कामाचा ताण पडण्याचा प्रश्नच कुठे येतो? आपण मराठीत म्हणतो की आपल्याला थोडं प्रेम आहे, थोडं कमी करावं. आम्ही तुम्हाला संघात घेत आहोत, आम्ही तुम्हाला भरपूर रिटेनर फी देखील देत आहोत. जर तुम्ही कामाच्या ओझ्यामुळे खेळत नसाल तर रिटेनर फी देखील सोडा.

भारताने 2013मध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आलेले आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांच्याविरुद्धच्या घरच्या मालिकेतही भारत जिंकला. पण, आशिया चषकाच्या साखळी फेरीतील अपयशानंतर विश्वचषक स्पर्धेत भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही.


हेही वाचा – भारतीय संघ दुसरे ‘चोकर्स’; कपील देव यांनीही केलं मान्य