घरक्रीडाIPL 2022: 'कोलकाता'च्या सुनील नरेनची 'या' नव्या विक्रमाला गवसणी

IPL 2022: ‘कोलकाता’च्या सुनील नरेनची ‘या’ नव्या विक्रमाला गवसणी

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील 41 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताला पराभव पत्करावा लागला. मात्र कोलताचा पराभव झाला असला तरी कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरेनने आपल्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वातील 41 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताला पराभव पत्करावा लागला. मात्र कोलताचा पराभव झाला असला तरी कोलकाताचा फिरकीपटू सुनील नरेनने आपल्या नावावर एक मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सुनील नरेनने एक विकेट घेत आयपीएलमधील 150 विकेटचा टप्पा पार केला आहे.

सुनील नरेन आयपीएलमध्ये 150 विकेट घेणारा पहिला विदेशी फिरकी गोलंदाज ठरला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 विकेट्सने पराभव करून आयपीएल 2022 मधील चौथा विजय नोंदवला. दिल्लीने या मोसमात खेळल्या गेलेल्या 8 पैकी चार सामने जिंकले आहेत तर तेवढेच सामने गमावले आहेत. त्याचबरोबर कोलकाताचा नऊ सामन्यांतील हा सहावा पराभव आहे. केकेआर तीन विजयांसह गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे. या पराभवामुळे केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांनाही धक्का बसला आहे.

- Advertisement -

सुनील नरेनने दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज ललित यादवला आपला 150 वा बळी बनवला. त्याने आपल्या तिसऱ्या षटकात ललितला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दिल्लीकडून कुलदीप यादवने सर्वाधिक 4 बळी घेतले. आयपीएलमध्ये 150 किंवा त्याहून अधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नरेन हा 8 व्या क्रमांकावर आहे. हा आकडा गाठणारा तो एकूण सहावा फिरकी गोलंदाज आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ड्वेन ब्राव्हो पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राव्होने 158 सामन्यात 181 विकेट्स घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा 122 सामन्यात 170 विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. तसंच, अमित मिश्रा 154 सामन्यात 166 विकेट्स घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहे. युझवेंद्र चहलने 122 सामन्यात 157 विकेट घेतल्या आहेत, तर आर अश्विनने 175 सामन्यात 152 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने 140 सामन्यात 151 विकेट घेतल्या आहेत. हरभजन सिंगने 163 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहेत. सुनील नरेनने 143 सामन्यांमध्ये 150 विकेट घेतल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा ‘नो बॉल’ वाद; कर्णधार रिषभ पंतनी पंचांना विचारला जाब

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -