IPL 2022: हैदराबादचा ‘हा’ फलंदाज लवकरच भारतीय संघात पदार्पण करू शकतो; माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा दावा

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) सनरायजर्स हैदराबाद सघातून फलंदाजी करणारा राहुल त्रिपाठी भारतीय संघात लवकरच पदार्पण करू शकतो, असा दावा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे.

इंडियन प्रिमीयर लीगमधील (आयपीएल) सनरायजर्स हैदराबाद सघातून फलंदाजी करणारा राहुल त्रिपाठी भारतीय संघात लवकरच पदार्पण करू शकतो, असा दावा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. मंगळवारी झालेल्या सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात हैदराबादचा मधल्या फळीचा फलंदाज राहुल त्रिपाठीनं तुफानी अर्धशतक ठोकलं. त्यानंतर रवी शास्त्री यांनी राहुलबाबतच्या भारतीय संघातील पदार्पणाबाबत वक्तव्य केलं. त्यामुळे आता राहुल त्रिपाठी भारतीय संघात पदार्पण करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नेमके काय म्हणाले शास्त्री?

“राहुल त्रिपाठी लवकरच भारतीय संघात स्थान मिळवण्याची शक्यता आहे. तो तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करतो. सतत त्याच्या बॅटमधून धावा निघल्यास लवकरच भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते त्याच्याबाबत नक्कीच विचार करतील. त्रिपाठी हा खूप आत्मविश्वासी खेळाडू आहे. त्याच्याकडील फटकारांची चांगली निवड मला जास्त आवडते. तो एक प्रभावी खेळाडू आहे”, असे रवी शास्त्री म्हणाले आहेत.

आयपीएल 2022 च्या यंदाच्या पर्वात त्रिपाठीने हैदराबादसाठी 39.30 च्या सरासरीने आणि 161.72 च्या स्ट्राइक रेटने तीन अर्धशतकांसह 393 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 39 चौकार आणि 19 षटकार आले. तसंच, मंगळवारी झालेल्या मुंबईविरुद्ध सामन्यात राहुल त्रिपाठीनं 172.73 च्या स्टाईक रेटनं 44 चेंडूत 76 धावा केल्या आहेत. यादरम्यान, त्यानं तीन षटकार मारले आहेत.

आयपीएलचे 15 वे पर्व अखेरच्या टप्प्यावर पोहचला आहे. यंदाच्या हंगामातील लीग स्टेजमधील फक्त पाच सामने उरले आहेत. तसंच, आता प्ले ऑफसाठीची लढत पाहायला मिळत असून, कोणता संघ यंदाचे आयपीएलचे जेतेपद पटकावणार याकडे सर्वच क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – तुफानी खेळीनंतर क्विंटन डी कॉकचे अफलातून क्षेत्ररक्षण; हवेत झेल घेत फलंदाजाला केले बाद