घरक्रीडाप्रेक्षकांविना खेळताना इतर खेळाडूंचा आधार!

प्रेक्षकांविना खेळताना इतर खेळाडूंचा आधार!

Subscribe

 जिमी अँडरसनचे उद्गार

प्रेक्षकांविना क्रिकेटचे सामने झाले, तर संघातील खेळाडूंनी एकमेकांना आधार देणे अधिक गरजेचे होईल, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जिमी अँडरसनने व्यक्त केले. करोनामुळे मार्चपासून सर्व प्रकारचे क्रिकेट बंद आहे. मात्र, लवकरच रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना क्रिकेट सुरू करण्याबाबत चर्चा होत आहे. इंग्लंडचा संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. परिस्थितीत सुधारणा झाली तरच हे सामने होऊ शकतील असे अँडरसनला वाटते.

आम्ही नशिबवान आहोत. कारण इंग्लंडमध्ये बहुतांश कसोटी सामने भरलेल्या स्टेडियममध्ये होतात. पहिले काही दिवस तरी चाहते मोठ्या संख्येने कसोटी सामना पाहण्यासाठी येतात. त्यामुळे आमच्यात वेगळीच जिद्द निर्माण होते. आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि आमचा खेळ आपोआपच उंचावतो. मात्र, आता आम्हाला प्रेक्षकांविना खेळावे लागू शकेल. तसे झाल्यास संघातील खेळाडूंनी एकमेकांना आधार देणे अधिक गरजेचे होईल. मैदानात प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या आवाजाऐवजी आम्हाला चेंडूचा आवाज येईल. ही परिस्थिती आमच्यासाठी वेगळी असेल. परंतु, आम्हाला याच्याशी जुळवून घ्यावे लागेल, असे अँडरसनने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -