AIFF अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल यांना हटवा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Supreme Court orders removal of Praful Patel from AIFF chairmanship
Supreme Court orders removal of Praful Patel from AIFF chairmanship

सर्वोच्च न्यायालयाने ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल यांना हटवण्यात आले आहे. या संस्थेचा प्रशासकीय कार्यभार सर्वोच्च न्यायालयाने एका समितीकडे दिला आहे. या समितीत निवृत्त न्यायामुर्ती अनिल आर देव, माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ एसएफ कुरैशी आणि माजी भआरतीय कर्णधार भास्कर गांगुली यांचा समावेश आहे. नव्या निवडणुका होईपर्यंत ही समिती फुटबॉल कार्यक्रमाचे संचालन करेल, असा निर्णय न्यायमुर्ती डी.वाय.चंद्रचूड, न्यायमुर्ती सूर्यकांत आणि न्यायामुर्ती पीएस नरसिम्हा यांनी दिला आहे.

भारतीय फुटबॉल संघटनेच्या निवडणुका डिसेंबर 2020मध्ये होणार होत्या. मात्र, फुटबॉल संघटनेने आपल्या संविधानाशी संबंधित सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगून निवडूक टाळली होती. प्रफुल्ल पटेल यांनी डिसेंबर AIFF अध्यक्ष म्हणून आपला तिसरा कार्यकाळ पूर्ण केला आहे. ते गेली 12 वर्ष अध्यक्ष होते. नियमांनुसार अध्यक्ष म्हणून हा कार्यकाळ जास्त आहे. त्यामुळे कोर्टाने त्यांना हटवण्याचा आदेश दिले आहेत.

समिती ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. निवडणुका घेण्यासाठी ही व्यवस्था केल्याचे न्यायालयाने सांगितले. यावेळी सविधानिक आणि लोकशाही पद्धतीने कारभार झाला पाहिजे. निवडणुका लवकरच होतील, अशी अपेक्षा कोर्टाने व्यक्त केली आहे. 12 मे रोजी दिल्ली फुटबॉल संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. AIFF चे अध्यक्ष आणि त्यांची समिती बेकायदेशीर पद्धतीने पदावर कायम असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.