घरक्रीडारैनासाठी भारतीय संघाचे दरवाजे कसे बंद झाले?, याचा एमएसके प्रसाद यांनी केला...

रैनासाठी भारतीय संघाचे दरवाजे कसे बंद झाले?, याचा एमएसके प्रसाद यांनी केला खुलासा

Subscribe

भारतीय संघात नसलेला सुरेश रैनाला असं वाटतं आहे की, त्याच्यावर राष्ट्रीय निवड समितीने (National Selection Committee)अन्याय केला आहे. परंतु समितीचे माजी प्रमुख एमएसके प्रसाद यांनी असं स्पष्ट केलं की, ‘२०१८-१९ डोमेस्टिक क्रिकेट सामन्यात त्यांची खेळी चांगली नव्हती.’ भारतासाठी २२६ एकदिवसीय आणि ७८ टी-२०सह १८ कसोटी सामने खेळणाऱ्या ३३ वर्षीय रैनाने जुलै २०१८ मध्ये इंग्लंडविरूद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

गेल्या वर्षी नेदरलँड्समध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेल्या रैनाला चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा होती. पण आता आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. रैनाने केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर एमएसके प्रसाद म्हणाले की, १९९९ मध्ये व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला भारतीय कसोटी संघातून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेट सामन्यामध्ये १४०० धावा केल्या. सीनियर खेळाडूंकडून हीच अपेक्षा असते.

- Advertisement -

रैनाने २०१८-१९चा डोमेस्टिक क्रिकेट सामन्यातील पाच रणजी सामन्यांत २४३ धावा केल्या. तर आयपीएल २०१९ च्या १९ सामन्यात ३८३ धावा केल्या होत्या. प्रसाद म्हणाले की, डोमेस्टिक क्रिकेट सामन्यात रैनाचा खेळ दिसून आला नाही, तर इतर युवा क्रिकेटर्सने त्यापेक्षा चांगला खेळ खेळला होता.

युट्यूब शो ‘स्पोर्ट्स टॉक’ रैनाने निवड समिती त्याला वगळण्याचे कारण देत नसल्याचा आरोप केला होता. तर हे खरं नसल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, निवडकर्ते रणजी सामने पाहत नाही, असं बोलणं खेदजनक आहे. राष्ट्रीय निवड समितीने गेल्या चार वर्षात किती सामने पाहिले आहेत यासाठी बीसीसीआयचे रिकॉर्ड चेक करा. त्यांनी स्वतः रैनाला बाहेर करण्याविषयी सांगितलं असल्याचं प्रसाद म्हणाले. ते म्हणाले की, मी त्याच्याशी वैयक्तिकरित्या बोललो. त्याने त्याच्या खोलीत बोलवून भविष्यात परत क्रिकेट मैदान उतरण्याची अपेक्षा सांगितली. त्यावेळेस त्याने मी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं होत. आता त्याचे हे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आहे.

- Advertisement -

एमएसके प्रसाद म्हणाले की, मी स्वतः गेल्या चार वर्षात उत्तर प्रदेशमधील लखनऊ आणि कानपूर येथील चार रणजी सामने पाहिले आमच्या निवड समितीने चार वर्षात २०० हून अधिक रणजी सामने पाहिले. संघाबाहेर असलेल्या सीनियर खेळाडूंनी मोहिंदर अमरनाथ याचं उदाहरण घेतलं पाहिजे, जे २० वर्षांच्या कारकीर्दीत संघातून किती वेळा बाहेर पडले आणि पुन्हा मैदानात उतरले.


हेही वाचा – Video: ‘तुम्ही आपल्या देशांची अर्थव्यवस्था आहात’, असं म्हणतं तळीरामांवर केला फुलांचा वर्षाव


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -