घरक्रीडा...म्हणून सुरेश रैनाचे भारतीय संघात पुनरागमन झाले नाही!

…म्हणून सुरेश रैनाचे भारतीय संघात पुनरागमन झाले नाही!

Subscribe

एम.एस.के प्रसाद यांनी केले स्पष्ट

भारताचा फलंदाज सुरेश रैनाने नुकतेच एका युट्युबवरील कार्यक्रमात ‘मला राष्ट्रीय संघातून का वगळण्यात आले याचे निवडकर्त्यांनी स्पष्टीकरण दिले नव्हते’ असा आरोप केला होता. २२६ एकदिवसीय, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळलेला रैना जुलै २०१८ पासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. परंतु, रैनाला वगळल्यानंतर मी स्वतः त्याच्याशी चर्चा केली होती आणि स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकले नाही, असे निवड समितीचे माजी अध्यक्ष एम.एस.के प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

आपल्यासमोर व्ही.व्ही.एस लक्ष्मणचे उदाहरण आहे. त्याला १९९९ मध्ये कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये १४०० हूनही अधिक धावा करत पुन्हा भारतीय संघात घेण्यास भाग पाडले. सीनियर खेळाडूला जेव्हा राष्ट्रीय संघातून वगळण्यात येते, तेव्हा त्याच्याकडून अशी कामगिरी अपेक्षित असते. रैनाला स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. दुसरीकडे युवा खेळाडू स्थानिक क्रिकेट आणि भारत ‘अ’ संघाकडून दमदार कामगिरी करत होते. त्यामुळे रैनाचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकले नाही, असे प्रसाद म्हणाले.

- Advertisement -

रैनाला भारतीय संघातून वगळल्यानंतर मी स्वतः त्याच्याशी चर्चा केली होती. तसेच पुनरागमन व्हावे यासाठी काय केले पाहिजे हेसुद्धा मी त्याला सांगितले होते. त्यावेळी मी त्याच्याशी चर्चा केल्याबद्दल त्याने माझे आभारही मानले होते. त्यामुळे तो आता अशी विधाने करत असल्याचे मला आश्चर्य वाटत आहे, असेही प्रसाद यांनी सांगितले. रैनाला २०१८-१९ च्या रणजी मोसमात पाच सामन्यांत केवळ २४३ धावा करता आल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -